आंचल अमित चिंतामणी राष्ट्रीय फ्लोअर स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक
जामखेड प्रतिनिधी,
नुकत्याच कन्याकुमारी येथे पार पडलेल्या राष्ट्रीय फ्लोअर बाँल स्पर्धा २०२४ मध्ये १९ वर्षे वयोगटात महाराष्ट्र संघाने अंतिम सामन्यात विजय मिळवत याही वर्षी करंडक पटकावला आहे.
यामध्ये आंचल अमित चिंतामणी हिची सलग दुसऱ्यांदा उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड झाली आहे. यामुळे आता आंतरराष्ट्रीय फ्लोअर बाँल स्पर्धेत तिला खेळण्याची संधी मिळणार आहे. याबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
इंटरनॅशनल फ्लोअरबाॅल फेडरेशन (IFF) अंतर्गत असलेल्या तामिळनाडू फ्लोअरबाॅल असोसिएशनच्या वतीने कन्याकुमारी येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय फ्लोअरबाॅल स्पर्धेत कु. आंचल अमित चिंतामणी या जामखेडच्या सुकन्येने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. या गौरवास्पद कामगिरीमुळे तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.
राष्ट्रीय फ्लोअरबाॅल स्पर्धेत आंचल अमित चिंतामणीस सुवर्णपदक मिळाल्यामुळे जामखेडच्या
शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. मागील वेळी तर जामखेड शहरात भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती.
आंचल हि दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अरूणशेठ चिंतामणी यांची नात तर
नगरसेवक अमित चिंतामणी, सौ. प्राजंल चिंतामणी यांची मुलगी आहे. तिच्या यशाबद्दल जामखेड सह परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नगरसेवक अमित चिंतामणी यांनी आपल्या सामाजिक, सांस्कृतिक व विकासात्मक कार्यामुळे जामखेडमध्ये जरी नाव कमावले असले तरी त्यांच्या कन्येने फ्लोअरबाॅल सारख्या खेळात राष्ट्रीयस्तरावर सुवर्णपदक मिळवून क्रिडा क्षेत्रात जामखेडचे नाव मोठे केले आहे. जामखेडच्या प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटावा तसेच जामखेडच्या प्रत्येक खेळाडूने प्रेरणा घ्यावी अशीच कु. आंचल अमित चिंतामणी हिची कामगिरी आहे.