देशाची खरी संपत्ती ही सुसंस्कृत विद्यार्थी आहेत, जमदारवाडी ग्रामस्थांमध्ये शैक्षणिक जागृता आहे – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे

लोकसहभागातून बांधलेल्या शाळा खोलीचे धनवे यांच्या हस्ते झाले लोकार्पण

जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील जमदारवाडी येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून बांधलेल्या शाळा खोलीचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी लोकार्पण करण्यात आले.
जामखेड नगरपरिषद हद्दीतील जमदारवाडी येथील शाळा खोलीची पुर्णपणे दुरवस्था झाली होती आसलेली शाळा खोली कधी पडलं आशी आवस्थेत विद्यार्थी जीव मुठीत धरून शिक्षण घेत होते दोन शिक्षकी शाळा परंतु बसण्यासाठी वर्गच उपलब्ध नसल्याने कधी शाळेची पडवी तर कधी झाडाखाली शाळा भरते.
हीच बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास आली व लोकसहभागातून शाळा बांधण्याचे ठरेल परंतु जागेचा प्रश्न निर्माण झाला त्याबाबत गावातील दानशूर दात्यांनी आपली जागा शाळेसाठी दान केली व लोकसहभागातून शाळा खोलीसह मैदानही तयार झाले
प्रजासत्ताकदिनी मोठ्या उत्साहात गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे व ग्रामस्थांच्या उपस्थित लोकार्पण सोहळा पार पडला.

यावेळी बोलताना धनवे म्हणाले की आपल्या देशाची संपत्ती हे सुसंस्कृत मुलं आहेत आपण इतर कितीही संपत्ती कमावली व मुलं वाम मार्गाला लागले तर ती संपत्ती कवडीमोल आहे.
जमदारवाडीचे ग्रामस्थ हे शौक्षणिकदृष्टया जागरुक आहेत त्यांनी शासनाच्या कोणत्याही मदतीशिवाय शाळेसाठी जागा उपलब्ध केली व लोकसहभागातून लाखो रुपये खर्च करून सुंदर अशी शाळा खोली तयार केली आहे
आसे आसताना जागा दानपञ देणाऱ्या दात्यांना काही आडचणींचा सामना करावा लागत आहे तरी आम्ही प्रशासकीय पातळीवर ही आडचण दुर करू आसे बोलताना सांगितले
यावेळी शाळेतील चिमुकल्यांनी देशभक्तीपर गीतासह विविध कार्यक्रमांचे सादरीकरण केले.
या प्रसंगी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, प्रा. युवराज भोसले,मुख्याध्यापिका शर्मिला मोटे यांच्यासह बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्जुन नेटके सर, सुञसंचालन शिक्षिका कल्पना पोटघन तर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *