मराठा आरक्षणाचा जीआर निघाल्याने जामखेड येथे मराठा बांधवांनी केला जल्लोष साजरा
जामखेड प्रतिनिधी
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून मराठा आरक्षणाला यश मिळाल्याने जामखेड येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने व मराठा समाजबांधवांन कडुन शहरातील खर्डा चौक या ठीकाणी डीजेच्या तालात वाजत गाजत व गुलालाची उधळण करून मोठा जल्लोष साजरा करण्यात आला.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या जवळपास सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मराठा समाजाकडून राज्यभरात जल्लोष साजरा करण्यात आला. याच अनुशंगाने जामखेड शहरात देखील फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.
जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याचे समजताच जामखेड शहरातील बीड कॉर्नर याठिकाणी जल्लोष साजरा करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते व मराठा बांधव मोठ्या संख्येने जमा झाले. या नंतर डी जे च्या तालावर व गुलालाची उधळण करीत बीड कॉर्नर ते खर्डाचौका पर्यंत विजयी रॅली काढण्यात आली. सदर रॅली खर्डा चौकात आल्यानंतर भव्य फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. व डी जे च्या तालावर मराठा बांधवांनी ठेका धरला होता. जमलेल्या कार्यकर्त्यांन कडुन गुलालाची उधळण करण्यात आली. एक मराठा लाख मराठा, छत्रपती श्री शिवाजी महाराजा की जय, श्री सभाजी महाराज की जय च्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी मराठा एकजुटीची ताकद सरकारला कळाल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली.
या वेळी मधुकर (आबा) राळेभात, अवधूत पवार, शहाजी राळेभात, संभाजी राळेभात, केदार रसाळ, तात्यासाहेब बांदल, डॉ. भरत देवकर, ॲड. घनश्याम राळेभात, दत्तात्रय सोले पाटील, डॉ प्रशांत गायकवाड, महेश यादव, विकास पवळ, जयसिंग उगले, गणेश हगवणे, काका चव्हाण, प्रशांत राळेभात, दादासाहेब सरनौबत, संभाजी ढोले, बापुसाहेब कार्ले, डॉ. सुशील पन्हाळकर, गुलाब जांभळे, प्रा. लक्ष्मण ढेपे, हरिभाऊ आजबे, कीसनराव ढवळे, तुकाराम ढोले, अविनाश पवार, आशोक घुमरे, गणेश पवार, दिपक ढोबे, संदिप गायकवाड, आण्णा कोल्हे, राजु भोगिल, मोईज शेख, प्रा.सुनिल नरके, डॉ. दिनेश रसाळ, सचिन भोरे, पप्पु राळेभात सह मराठा बांधव उपस्थित होते.
चौकट
मराठा आरक्षणासाठी वेळो वेळी झालेल्या आंदोनास मुस्लिम बांधवांनी सहभाग घेऊन पाठींबा दर्शविला होता. तसेच मुस्लिम बांधवांनी मराठा आंदोलकांना आंदोलना दरम्यान मदतही केली होती. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा आद्यादेश आल्यानंतर मराठा बांधवांच्या जल्लोषात खर्डा चौक या ठीकाणी मुस्लिम बांधवही सहभागी झाला व मुस्लिम व मराठा बांधवांनी ऐकमेकांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला.