75 वा प्रजासत्ताक दिन श्री नागेश संकुलात उत्साहात संपन्न

75 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील व जगातील सर्वात मोठे विद्यार्थी रचनेतील चित्र रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय संकुल जामखेड मध्ये साकार.

जामखेड प्रतिनिधी,

रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय व कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मध्ये 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला.
ध्वजारोहण स्कूल कमिटी सदस्य विनायक विठ्ठलराव राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती स्थानिक स्कूल कमिटीचे हरिभाऊ बेलेकर, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेंद्रजी कोठारी, कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष प्राध्यापक मधुकर आबा राळेभात, सुरेश भोसले ,प्रकाश सदाफुले , अशोक यादव, प्राचार्य मडके बि के मुख्याध्यापिका चौधरी के डी, पर्यवेक्षक कोकाटे व्ही के. पर्यवेक्षक संजय हजारे, शिवाजी ढाळे ,सुनील उगले, दिगंबर चव्हाण प्राचार्य सदाफुले, प्राचार्य मुरूमकर, शिवनेरीचे संचालक लक्ष्मण भोरे, अमोल गिरमे, काशीद एस आर, भाग्यश्री राऊत, दुगम सुदेश, सुरेश गोसावी आजी माजी सैनिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार रोहित दादा पवार यांच्या संकल्पनेतून व स्थानिक स्कूल कमिटीच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य मडके बीके यांच्या सूचनेनुसार 75 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सव निमित्त रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश संकुलात भव्य विश्व रेकॉर्ड करण्यात आले . कलाशिक्षक तथा एनसीसी ऑफिसर मयूर कृष्णाजी भोसले यांनी हे साकारले या मानवी चित्राची लांबी 240 व रुंदी 225 फूट असून क्षेत्रफळ 54000 स्क्वेअर फुट वर्तुळाकार रचनेची त्रिज्या 101 फूट व क्षेत्रफळ 32031 स्क्वेअर फुट आहे या वर्तुळाकार चित्रात विद्यार्थी बैठक रचनेत भव्य भारताचा नकाशा तसेच जय हिंद जय भारत नाव साकारले. 75 वा प्रजासत्तक दिन अमृत महोत्सवाचे निमित्त साधून 75 मीटर तिरंगा विद्यार्थ्यांनी हातात धरून फडकवला आहे.
भारताचा नकाशा मधील विद्यार्थ्यांच्या हातात छोटे राष्ट्रध्वज देण्यात आले. श्री नागेश व कन्या विद्यालय मधील 2500 विद्यार्थी विद्यार्थिनी व 17 महा बटालियन चे नागेश विद्यालयाचे एनसीसी कॅडेट सहभागी झाले.
तसेच 17 महाराष्ट्र बटालियनचे श्री नागेश विद्यालय एनसीसी युनिट उत्कृष्ट संचलन सादर करून मानवंदना दिली.
देशात व जगातील सर्वात मोठे चित्र इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, अशिया बुक रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड साठी पात्र आहे.

यावेळी प्राचार्य मडके बी के यांनी प्रस्ताविकात नागेश विद्यालयाच्या प्रांगणात आमदार रोहित दादा पवार यांच्या संकल्पनेतून व स्कूल कमिटीच्या मार्गदर्शनाखाली विद्यालय नेहमीच विविध उपक्रम राबवते याचाच एक भाग म्हणून प्रजासत्ताक दिनी भारताचा नकाशा मानवी साखळीने तयार केले व हे विश्व रेकॉर्ड साकार झाले आहे. रेकॉर्ड इंडिया बुक ,अशिया बुक साठी पात्र आहे असे मनोगत व्यक्त केले
स्कूल कमिटी सदस्य सुरेश भोसले यांनी मनोगतामध्ये संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य बंधुता ,समता ,एकता आपले हक्क दिले. प्रजासत्ताक दिनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
विनायक राऊत यांनी मी या विद्यालयात माजी विद्यार्थी आहे व माझ्या हस्ते ध्वजारोहण होत असल्याने ही एक अभिमानास्पद बाब आहे. 75 व्या प्रजासत्ताक दिनी नागेश संकुलात विश्व विक्रम होत असल्याचा अभिमान वाटत आहे असे मनोगत व्यक्त केले.
नागेश कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाषणे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
एनसीसी संचलन नियोजन एनसीसी ऑफिसर मयुर भोसले यांनी केले कार्यक्रमाचे सदस्य संभाजी इंगळे तर आभार प्रदर्शन संजय हजारे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *