जामखेड तालुका शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी पत्रकारांचे मोलाचे योगदान :- गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे..
जामखेड :- जामखेड तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक गुणवत्ता वाढ झाली आहे. या मध्ये विध्यार्थी, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांना पत्रकारांनी प्रेरणा व प्रोत्साहान दिले. चांगल्या कामाचे कौतुक करून त्यांना वर्तमान पत्रात प्रसिद्धी दिली. त्यामुळे शिक्षक, अधिकारी, यांनी अधिक जोमाने काम चालू केले, त्यामुळे जामखेड तालुक्याची शैक्षणिक गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर वाढ झाली.
त्यात तालुक्यातील पत्रकारांचा सिहांचा वाटा असल्याचे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी श्री. बाळासाहेब धनवे यांनी केले.
गटशिक्षणाधिकारी कार्यालय पं. समिती जामखेड यांच्या वतीने पत्रकार दिन पंचायत समिती सभागृहात साजरा करण्यात आला. त्यावेळी सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
त्यावेळी बोलतांना धनवे पुढे म्हणाले की नुकतीच मा. न्यायालयाच्या कमिटीने प्रत्येक शाळेवर जाऊन तपासणी केली, त्यांनीही तालुक्यातील शाळेची स्वच्छता व गुणवत्ता याविषयी समाधान व्यक्त केले. कापसेवस्ती सारख्या शाळेवरील मुले 43 चा पाढा म्हणतात ही अभिमानास्पद बाब आहे.
त्यावेळी शिक्षक संघटनेचे नेते राम कदम, नारायण राऊत, विजय जाधव यांचेही भाषणे झाली. त्यावेळी शिक्षक बँकेचे संचालक संतोष राऊत, मुकुंद सातपुते, नवनाथ बहिर, किसन वराट, शिक्षणविस्तार अधिकारी केशव गायकवाड, सुरेश मोहिते, केंद्र प्रमुख विक्रम बडे, नवनाथ बडे, वरिष्ठ सहाय्यक बाळासाहेब गांगर्डे, श्रीमती काव्या कात्रजकर, रमेश निमसे, आदी मान्यवर व पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण राऊत यांनी केले.