प्रभु श्री रामावर निष्ठा ठेऊन काम केले तर जिवन सार्थक होते- सद्गुरु संन्यासी पागल बाबा
खर्डा येथे श्री राम मंदिर पायाभरणी कार्यक्रम संपन्न….
जामखेड प्रतिनिधी
राम नामावर विश्वास ठेऊन संकल्प हाती घेतला तर त्याला तारुन नेण्याची शक्ती भगवंत मनुष्य जीवाला देत असतो. आज पर्यंत अनेक मंदिरे उभी करताना याची प्रचीती अनुभवली आहे. प्रभु श्रीरामाचे वास्तव्य आपल्या शरीरात आहे. शरीरातून राम निघून गेल्या नंतर शरीर कवडीमोल आहे. मनात राम कार्यात राम व रामावर निष्ठा ठेऊन आपले कार्य करत राहील्यास जिवन सार्थक होते असे मत श्री १०८ महंत योगी बाल योगी ब्रम्हऋषी महात्यागी अवदुत चिंतन सद्गुरु संन्यासी पागल बाबा यांनी व्यक्त केले.
सद्गुरु दादागुरु गोरक्षनाथ महाराज यांच्या प्रेरणेने व श्री १०८ महंत योगी बाल योगी ब्रम्हऋषी महात्यागी अवदुत चिंतन सद्गुरु संन्यासी पागल बाबा यांच्या मार्गदर्शनाने खर्डा येथील शिवपट्टन येथे भव्य प्रभू श्री राम मंदिर उभारणी व पायाभरणी कार्यक्रम आज दि २५ जानेवारी २०२४ रोजी’ सकाळी श्री १०८ महंत योगी बाल योगी ब्रम्हऋषी महात्यागी अवदुत चिंतन सद्गुरु संन्यासी पागल बाबा यांच्या हस्ते मंदिर पायाभरणी भुमिपुन समारंभ संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी ह भ प महालिंग नगरे, हभप.संपत जायभाय, ह भ प सन्याशी पागल बाबा, तसेच रवी (दादा) सुरवसे, सरपंच संजीवनी वैजिनाथ पाटील, माजी सरपंच संजय (आबा) गोपाळघरे, ग्रा. पं. सदस्य रंजना श्रीकांत लोखंडे, सुनिल साळुंके, शितल शिंदे, रामदादा भोसले, शिवा गवसने, टिल्लू पंजाबी, बाळासाहेब रासने, विकास शिंदे, रमेश गोलेकर, भैय्या शहा, तुकाराम शिंदे, पत्रकार अनिल धोत्रे, किरण काळे, काका शिंदे, शरद शिंदे, विठ्ठल खारगे, गणेश सुळ, विशाल साळुंके संजय पेडगावकर, स्वप्निल शहा, धनसिंग साळुंके व रामभक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या नंतर महालिंग महाराज बोलताना म्हणाले की खर्डा नगरीत श्री रामाचे मंदिर होत आहे ही आनंदाची बाब आहे. चंद्र सुर्य जो पर्यंत आहेत तो पर्यंत हे मंदिर टीकण्यासाठी दगडी बांधकामाच्या माध्यमातून हे मंदिर उभा करण्यात येणार आहे. साधनेचे फळ आपल्या पदरात पडत असते संकटावर मात करण्यासाठी साधु भगवंताच्या रुपाने आपल्याला भेटत असतात. आजचा तरुण सुधारला तर महाराष्ट्र सुधारेल याच प्रमाणे तरुणांनी व्यसनापासून दुर करण्याचे काम पागल बाबा हे करत आहेत.
गंगेने वहात रहावे व साधनेने फीरत रहावे आनेक ठीकाणी फीरुन सिद्ध संत सिताराम बाबांनी आपल्या भागात अनेक मंदिरे उभा केली आहेत. सिताराम बाबांच्या आशिर्वादाने व शक्तीने खर्डा भागातील देवदेवतांचे बांधकाम व सुशोभीकरण होऊन परीसराचा विकास होत आहे.
या नंतर खर्डा येथील सरपंच वैजनाथ पाटील यांनी बोलताना सांगितले की खर्डा येथे श्री राम मंदिर होत आहे हा शिवपट्टन वासीयांसाठी आनंदाचा क्षण आहे. आयोद्धेतील श्री राम मंदिर पाया भरणी कार्यक्रम हा देशभरात मोठा उत्सव साजरा झाला. त्याच प्रमाणे खर्डा याठिकाणी देखील नागरिकांनी श्री राम मंदिर बांधकाण्याचे काम हाती घेतले आहे. श्री राम मंदिर उभारणीसाठी काही मदत लागल्यास ती ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व नागरीकांच्या सहकार्याने पुर्णत्वाकडे नेले जाईल असे सांगितले.
अयोध्येत राम मंदिर उभे होत आसतानाच खर्डा येथे देखील श्री राम मंदिराचे बांधकाम सुरू झाले आहे. या कामात खर्डा पंचक्रोशीतील नागरिकांनी सढळ हाताने योगदान द्यावे असे मत माजी सरपंचप संजय गोपाळघरे यांनी व्यक्त केले.
खर्डा येथील श्री राम मंदिर उभारणीसाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांना जागा उपलब्ध करून दिली आहे. जो काही नीधी लागेल तो नीधी आम्ही ग्रामस्थांच्या मदतीने उपलब्ध करून देऊ असे रवी सुरवसे यांनी सांगितले.