*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेतून 158 घरांना 1 कोटी 89 लाख 20 हजार रूपयांच्या निधीस मंजुरी – आमदार प्रा.राम शिंदे*
*जामखेड तालुक्याला 141 तर राहुरी तालुक्याला 17 घरांना मंजुरी*
जामखेड प्रतिनिधी,
महायुती सरकारने राज्यातील भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी हाती घेतलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेतून (धनगर समाज घरकुल योजना) अहमदनगर जिल्ह्यात 158 घरांना शासनाने मंजुरी दिली आहे. यासाठी 1 कोटी 89 लाख 20 हजार रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये जामखेड तालुक्यासाठी 141 तर राहुरी तालुक्यासाठी 17 घरांना मंजुरी मिळाली आहे. याबाबतचा शासन निर्णय इतर मागास बहुजन कल्याण विभागाने जारी केला आहे, अशी माहिती आमदार प्रा राम शिंदे यांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेंतर्गंत, भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याच्या योजनेंतर्गत जिल्हास्तरीय समितीने राज्य शासनास घरकुलांचे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केले होते. शासनाने अहमदनगर जिल्ह्यातील 158 प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. मंजुर प्रकरणांमध्ये जामखेड तालुक्यातील सर्वाधिक 141 प्रकरणे मंजुर झाली आहेत. मंजुर झालेल्या एकुण 158 घरांसाठी एकुण एक कोटी एकोण्णव्वद लाख वीस हजार रूपये निधी वितरीत करण्यास शासनाकडून मान्यता मिळाली आहे. याबाबतचा शासन निर्णय इतर मागास बहुजन कल्याण विभागाने जारी केला आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेंतर्गंत, भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याच्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे जामखेड तालुक्यासाठी तब्बल 141 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. जामखेड तालुक्यातील गोरगरीब धनगर बांधवांना हक्काचा निवारा मिळण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे. 141 घरांना मंजुरी मिळाल्यामुळे जामखेड तालुक्यातील धनगर समाज बांधवांमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेंतर्गंत जामखेड तालुक्यात मंजुर झालेली गावनिहाय घरे पुढील प्रमाणे (संख्या कंसात) : मोहा (11), मुंजेवाडी (2), हळगाव (8) , रत्नापुर (1), पिंपरखेड (4), पिंपळगाव आळवा (5) कवडगाव (7) देवदैठण (1), सावरगांव (2), चोंडी (31) जवळा (27), नान्नज (2), मोहरी (20), दिघोळ (18) जवळके (1), कुसडगाव (1) असे एकुण 141 घरांना शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. तर राहुरी तालुक्यासाठी 17 घरांना मंजुरी मिळाली आहे.
*चौकट*
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेंतर्गंत घरकुले मंजुर व्हावीत यासाठी पाठपुरावा केला होता. जामखेड तालुक्यासाठी 141 व राहुरी तालुक्यासाठी 17 असे एकुण 158 घरांना महायुती सरकारने मंजुरी दिली आहे. त्यासाठी सरकारने 01 कोटी 89 लाख 20 हजार निधी उपलब्ध करून दिला आहे. या योजनेच्या माध्यमांतून गोरगरीब कुटूंबातील नागरिकांना या योजनेच्या माध्यमांतून हक्काचा निवारा मिळण्यास मदत होणार आहे. महायुती सरकारने अहमदनगर जिल्ह्यासाठी 158 घरांना मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील तसेच महायुती सरकारचे मनापासून आभार.. !
* – आमदार प्रा राम शिंदे*