*श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पिंपरखेड येथील हनुमान मंदिर 1001 दिव्यांनी उजळले*
आयोध्येतील श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पिंपरखेड येथे बापुराव ढवळे मित्रमंडळ व आर एस एसच्या वतीने
विविध कार्यक्रम संपन्न
आयोध्येत श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पिंपरखेड येथे बापुराव ढवळे मित्रमंडळ व आर एस एसच्या वतीने सकाळी होमहवन, पुजा अर्चा, महाप्रसाद वाटप
सायंकाळी दीपोत्सव तसेच किर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यासाठी पिंपरखेड परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाचे जामखेड तालुका उपाध्यक्ष व पिंपरखेडचे माजी सरपंच बापुराव ढवळे मित्रमंडळाच्या वतीने व आर एस एस मित्र मंडळ पिंपरखेड येथील हनुमान मंदिरात सकाळी पुजा अर्चा करण्यात आली, यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
सायंकाळी मंदिर परिसरात दीपोत्सव साजरा दिव्याच्या रोषणाई मुळे परिसर चांगलाच उजाळून आला होता.
सायंकाळी पाठक महाराज यांचे सुश्राव्य असे किर्तन झाले. यावेळी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता.
देशभरात रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. तोच उत्साह पिंपरखेड मध्ये बापुराव ढवळे मित्रमंडळाच्या व आर एस एस यांच्या वतीने गावात दिवसभर दिसून आला.