पवन राळेभात सह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

जामखेड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा खिंडार

 

जामखेड प्रतिनिधी,

जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक पवन राळेभात व जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती दादासाहेब रिटे सह शेकडो कार्यकर्त्यांनी आज आमदार प्रा राम शिंदे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मधुन भाजपामध्ये प्रवेश केला यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा खिंडार पडले आहे.

आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी आज चौंडी येथे भाजपामध्ये प्रवेश केला यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, रवी सुरवसे, नगरसेवक अमित चिंतामणी, शरद कार्ले, सोमनाथ पाचारणे, बापुराव ढवळे, डॉ. भगवानराव मुरूमकर, अँड प्रविण सानप, बिभीषण धनवडे, सचिन पोठरे, संपत राळेभात, सोमनाथ राळेभात, अर्जुन म्हेत्रे, अर्चना राळेभात, संजिवनी पाटील, गौतम उतेकर, प्रशांत शिंदे, तात्याराम पोकळे, उद्धव हुलगुंडे, नानासाहेब गोपाळघरे, बाळासाहेब गोपाळघरे, जाकीर शेख, ज्ञानेश्वर झेंडे, डॉ. राळेभात यांच्या सह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना पवन राळेभात म्हणाले की, माझे वडील महादेव अप्पा राळेभात यांनी जामखेड तालुक्यात शिवसेनेच्या माध्यमातून हिंदुत्वाचा विचार रूजवला आणि आता पुन्हा जोमाने काम करत आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मतदारसंघ भाजपमय करणार आहे.

यावेळी बोलताना आमदार प्रा. राम शिंदे म्हणाले की, भाजपाच्या लोकांना त्रास देऊन झालेले प्रवेश पुन्हा स्वगृही परतत आहेत. भाजपामध्ये प्रवेश करणारे कार्यकर्ते मनाने करत आहेत. कोणावरही कसलाही दबाव नाही. तत्कालीन शिवसेना तालुकाप्रमुख व जामखेडचे सरपंच कै. महादेव राळेभात यांनी हिंदुत्वाचा विचार ठेवला आज पुन्हा पवनने भाजपाची विचारधारा स्विकारली आहे. पवनच्या माध्यमातून शहरात विकासाचे चांगले काम करता येणार आहे.

आडवा आडवी व खुनशी पद्धतीचे राजकारण भाजपा कधीच करत नाही. विरोधकांनी लोकांना त्रास देत प्रवेश घेतले होते आता पुन्हा परतत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *