जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील आठ युवक पालीताना येथे यात्रा करून जामखेड येथे आल्या मुळे भव्य स्वागत समारंभ चे आयोजन केले असून २ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ३:३० वाजता जैन स्थानकातून वर घोडा सवाद्य मिरवणूक निघणार असून मेन रोड ,कोर्ट रोड ,मोगलपुरा ,नगर रोड मार्गे महावीर भवन येथे मिरवणुकीचे समारोह होणार असून सत्कार समारंभाचे आयोजन केले आहे.

या कार्यक्रमांमध्ये जामखेड येथील केतन मनोज भंडारी ,आनंद संजय बोरा, ऋषी सचिन भंडारी, जिग्नेश विनोद बोरा, साहिल विनोद बेदमुथा ,ओम राहुल बेदमुथा, मोहित जवाहर बेदमुथा, करण अभय बेदमुथा तसेच मिरजगाव येथील गिरीश सुनील कटारिया ,सिद्धार्थ प्रशांत कटारिया ,सहज मनोज कटारिया ,सुजल महेंद्र कटारिया ,शुभम सुनील कोठारी ,ऋषभ दीपक कोठारी, हार्दिक राजेंद्र कोठारी ,पुनीत संदीप बोरा ,वृषभ राजेंद्र बोरा यांनी पालीताना येथील आदिनाथ भगवान च्या आदिनाथ भगवान यांच्या देवस्थान मंदिर दोन दिवसात सात वेळेस जाऊन येऊन ५३२०० पायऱ्या चढउतार केल्या.

यावेळी दोन दिवस अन्नत्याग पाणी त्याग आणि चप्पल बूट त्याग अशा कठीण” सात यात्रा “ची त्यांनी पूर्णता केली आहे त्यामुळे जामखेड येथे त्यांचा भव्य स्वागत समारंभ करण्यात आलेला आहे
या सर्वांची सेवा करण्यासाठी प्रणित संदीप बोरा ,मनीष अभय बोरा, शुभम राजेंद्र बोरा, हर्षद प्रफुल्ल कोठारी यांनी दोन दिवस या सर्वांची सेवा केली त्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.


यावेळी जैन स्थानकातून मिरवणूक महावीर भवन मध्ये आल्यानंतर त्यांचा सत्कार समारंभ होईल ५:३०ते ६:३० गौतम प्रसादी बोरा,भंडारी ,बेदमुथा परिवार यांच्या मार्फत ठेवण्यात आलेली आहे यानंतर भक्ती संध्या अनुप जैन यांचा कार्यक्रम ठेवलेला आहे अशी माहिती श्री जय आदिनाथ युवा मंच सदस्यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *