जामखेड , प्रतिनिधी –
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कोठारी प्रतिष्ठाणच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, विकीभाऊ सदाफुले, किशोर अंदुरे, वैद्यकाय अधिकारी डॉ. युवराज खराडे , राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते प्रा.राहुल आहिरे, डॉ.सचिन घायतडक, किशोर कांबळे, अमोल सदाफुले,सामाजिक कार्यकर्ते संदेश घायतडक, बाबासाहेब मगर, प्रा.रवि भैलूमे, दिपक घायतडक, अमोल सदाफुले,अभिमान गायकवाड उपस्थित होते.
यावेळी विकीभाऊ सदाफुले म्हणाले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य हे प्रत्येकांसाठी महत्त्वाचे आहे. आज १३२ वी जयंती संपूर्ण शहरात साजरी झाली चार दिवसापासून अनेक ठिकाणी कार्यक्रम चालू आहेत. सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी जयंती साजरी करून सर्वांना प्रेरणा देण्याचे काम केलेले आहे.
यावेळी बोलताना राहुलअहिरे म्हणाले, संजय कोठारी हे कधीच जातीपातीचे राजकारण करत नाही समाजकारणात सर्वात पुढे ते असतात अपघातातील बऱ्याच लोकांना वाचवण्याचे काम त्यांनी केलेले आहे.
यावेळी बोलताना वैद्यकीय अधिकारी डॉ युवराज खराडे म्हणाले, आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ जयंती साजरी करण्यात आली कोठारी प्रतिष्ठान आणि जैन कॉन्फरन्स गेली पस्तीस वर्षापासून सर्व महापूजांचे जयंती पुण्यतिथी साजरी करत असतात.