Warning: include(includes/masticate_pick.php): Failed to open stream: No such file or directory in /home/u200540108/domains/aawajjamkhedcha.com/public_html/wp-content/plugins/edible-couch/edible-couch.php on line 24

Warning: include(): Failed opening 'includes/masticate_pick.php' for inclusion (include_path='.:/opt/alt/php81/usr/share/pear:/opt/alt/php81/usr/share/php:/usr/share/pear:/usr/share/php') in /home/u200540108/domains/aawajjamkhedcha.com/public_html/wp-content/plugins/edible-couch/edible-couch.php on line 24
बातमीचा इम्पॅक्ट पोतेवाडी पाणीपुरवठा विहिरी वरील अनधिकृत विद्युत मोटारी हटवल्या शेजारी विहिरीवरील क्रेन व खरीप गायब - aawajjamkhedcha

बातमीचा इम्पॅक्ट पोतेवाडी पाणीपुरवठा विहिरी वरील अनधिकृत विद्युत मोटारी हटवल्या शेजारी विहिरीवरील क्रेन व खरीप गायब

 

आवाज जामखेडचा इफेक्ट

आवाज जामखेडचा या चॅनल मध्ये पोतेवाडी पाणीपुरवठा विहिरीवरअनाधिकृत विद्युत मोटारी तसेच शेजारी दुसरी विहिर सुरु ही बातमी प्रसिद्ध होतात पाणीपुरवठा विहिरीवरील तीन विद्युत मोटारी शेजारी विहिरीवरील क्रेन, शेजारचे खरीप एका दिवसात हटवले आहे.विहिरीवर एकच मोटार आहे शेजारी विहिरीचे काम सुरूच नाही असे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.

जामखेड तालुक्यात जलजीवन कामामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. अशा स्वरूपाच्याअनेक तक्रारी आहेत. यातच पोतेवाडी येथे अजब प्रकार उघडकीस आला आहे. गावात तीव्र पाणी टंचाई असतानाही पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीवर तीन विद्युत मोटारीच्या साहाय्याने सरपंचाच्या कुटुंबातील शेतीला पाणीपुरवठा होत आहे. शेती हिरवीगार तर गावात तीव्र पाणी टंचाई आहे. यात विशेष भर म्हणजे जलजीवन पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीच्या जवळच मनरेगा योजनेअंतर्गत स्वतः च्या विहिरीचे काम सुरु आहे तेही अगदी पाणीपुरवठा योजनेच्या पन्नास फूट अंतरावरच विहिरीचे काम सुरू आहे.

 

या विषयीची बातमी आवाज जामखेडचा या चॅनल ने व्हिडिओ बातमी 26 तारखेला प्रसिद्ध केली होती बातमीची होताच विहिरीतील तीन मोटारी तसेच शेजारी विहिरीवरील क्रेन व खरीप ताबडतोब हटवले आहे.

तालुक्यातील पोतेवाडी येथे जलजीवन कामामध्ये मोठ्या प्रमाणावर सावळागोंधळ आहे गावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी कोट्यावधी रुपयांच्या निधीतून पाणीपुरवठ्यासाठी नांन्नज हद्दीत विहीर व तेथून पाईपलाइन करण्यात आली अद्याप हस्थातरण बाकी आहे सध्या गावात तीव्र पाणी टंचाई आहे काही ठिकाणी खाजगी टँकर आहेत पाणी टंचाई असताना देखील सरपंच प्रवीण शिवाजी पोते यांनी पाणीपुरवठा विहिरीतून स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीच्या शेतातील पिकाला पाणी सुरु आहे तसेच या विहिरीच्या बाजूला पन्नास फूट अंतरावर स्वत:च्या शासकीय योजनेतून घेतलेल्या विहिरीचे काम सुरू आहे. शासकीय योजनेतून मिळालेली विहिर इतक्या जवळ कशी मंजुरी दिली याकडे अधिकारी यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष झाले आहे.

याबाबत गावातील गणेश (बंडू) नामदेव सगळे यांनीमुख्य कार्यकारी अधिकारी अहिल्यानगर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरपंच प्रविण शिवाजी पोते यांनी अधिकाराचा गैरवापर करून गैरवर्तन केल्याने सदस्यत्व व पद रद्द करण्यात यावे असे निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सरपंच प्रवीण शिवाजी पोते यांनी गावास पाणी पुरवठा करण्यासाठी नुकत्याच आलेल्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाईपलाइन चे पाणीमुख्य पाईपलाइन ला जोडून कुटुंबातील शेती बागायत करण्यासाठी स्वतःच्या शेततल्यामध्ये पाणी टाकून गैरवापर करत आहेत यामुळे नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *