जामखेडमध्ये चोरांचा कहर! विहिरीवरून १९ हजारांचा विद्युत पंप गायब – शेतकरी त्रस्त

जामखेडमध्ये चोरांचा मोर्चा शेतकऱ्यांकडे !! विहिरीवरून १९ हजारांचा विद्युत पंप गायब – शेतकरी त्रस्त

जामखेड प्रतिनिधी,

जामखेड तालुक्यातील सांगवी गावात शेतकऱ्यांच्या विहिरीवरून विद्युत पंप चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. शेतीच्या महत्त्वाच्या हंगामात घडलेल्या या घटनेमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, संताप आणि भीतीचे वातावरण आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,फिर्यादी जाकीर शेख (वय ४५, शेती, रा. सांगवी, ता. जामखेड, जि. आहिल्यानगगर) यांच्यासह भाऊ शहाजहान अब्दुल अजिज यांच्या शेत गट नं. २७७,२/ (सांगवी गावचे शिवार) येथे ही चोरी घडली. दिनांक १८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६:०० ते दिनांक १९ एप्रिल रोजी सकाळी या कालावधीत अज्ञात चोरट्याने विहिरीवरील विद्युत पंप आणि खड्ड्यातील केबल चोरून नेली आहे . एकूण १९,००० रुपयांचा मुद्देमाल असा आर्थिक फायद्यासाठी हा डाव असल्याचे फिर्यादींनी सांगितले.

या भागात अलीकडे विहिरीवरील पंप चोरीचे सत्र सुरू आहे. शेतकऱ्यांना पाणीपुरवठा खंडित होऊन पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. स्थानिक शेतकरी म्हणाले, “हंगामात पंप गेला तर लाखांचे नुकसान होते”

याबाबत दिनांक 20 एप्रिल रोजी दुपारी जामखेड पोलीस ठाण्यात गु. क्र.. २२७/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०३(२) (चोरी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल इंगळे करीत आहेत.

जिल्ह्यातील चोरीचा ट्रेंड आणि शेतकऱ्यांचा संताप
आहिल्यानगगर जिल्ह्यात (जामखेड, संगमनेर, राहुरीसह) विहिरीवरील पंप आणि केबल चोरीचे प्रकार वाढले आहेत. भंगार व्यापाऱ्यांशी कनेक्शन असल्याचे बोलले जात आहे. शेतकऱ्यांनी पोलिस गस्त वाढवण्याची मागणी केली असून, “शेतीचं नुकसान करणाऱ्यांना कठोर शिक्षा हवी” असे म्हणत आहेत.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles