बावी येथे वादळी वाऱ्याचा कहर, तीन गायींचा मृत्यू, फळबागांचे नुकसान

बावी येथे वादळी वाऱ्याचा कहर, तीन गायींचा मृत्यू, फळबागांचे नुकसान ..

जामखेड प्रतिनिधी,

जामखेड तालुक्यातील बावी गाव व परिसरात शुक्रवारी दुपारी आलेल्या वादळी वारा व अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. वादळामुळे लाईटचा करंट गायीच्या शेडमध्ये उतरला यात तीन गायी जागीच मृत्यूमुखी पडल्या तर मालक थोडक्यात बचावले त्यांनाही जोरदार करंट बसला शेकडो झाडे उन्मळून पडल्याने लिंबोणीच्या फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.

जामखेड तालुक्यातील बावी येथील पवन जाधव यांच्या शेडमध्ये वादळामुळे विजेचा करंट उतरला या तीन गाई मृत्युमुखी पडल्या तसेच पवन जाधव यांना जोरदार विजेचा करंट बसला तेही चक्कर येऊन पडले व तोंडातून रक्त आले. शेजारच्या लोकांनी त्यांना ताबडतोब दवाखान्यात दाखल केले. सध्या त्यांची तब्येत धोक्याबाहेर आहे धोका टळला आहे. तसेच वादळामुळे परिसरातील लिंबोणीच्या बागेची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे झाडे उन्मळून पडले आहेत. सचिन मुरुमकर ,बयाजी पवार, दत्ता कारंडे, अभिमान पवार, मधुकर पवार यांच्या बागेचे नुकसान झाले आहे.

शेतकरी सचिन मुरुमकर म्हणाले की दहा वर्ष मेहनत करून लिंबोणीची बाग उभी केली दहा मिनिटाच्या वादळात सगळी झाडे उन्मळून पडली. लाखो रुपयांचे कर्ज कसे फेडणार. पुढील दोन दिवस राहिल्या नगर जिल्ह्याला वादळी वारा व विजांसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी फळबागांना आधार द्यावा, काढणीला आलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, असे आव्हान कृषी विभागाने केले आहे.

जामखेड प्रशासनाने ताबडतोब पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना मोबदला दिला पाहिजे आधी शेतकरी दुष्काळाने जेरीस आला आहे दुबत्या गाया मृत्यू पडल्या काही शेतकऱ्यांच्या लिंबोणीच्या बागा भुईसपाट झाले आहेत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता शेतकर्यांनी जीवन कसे जगायचे प्रशासनाने पंचनामे ताबडतोब करावीत.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles