Home जामखेड वार्ता जामखेड नगर परिषद हद्दीत जनगणना-घरगणना मोहिमेला उत्साहात प्रारंभ.

जामखेड नगर परिषद हद्दीत जनगणना-घरगणना मोहिमेला उत्साहात प्रारंभ.

0
4

जामखेड नगर परिषद हद्दीत जनगणना-घरगणना मोहिमेला उत्साहात प्रारंभ.

जनगणना हे देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे कार्य:-
मुख्याधिकारी – अजय साळवे

जामखेड :
भारतीय जनगणना 2026-27अंतर्गत पहिल्या टप्प्यातील घरगणना मोहिमेला जामखेड नगर परिषद हद्दीत उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला आहे. ही घरगणना मोहीम दिनांक 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत राबविण्यात येणार असून, नगरपरिषद हद्दीतील सर्व घरांची अचूक माहिती संकलित करण्याचे कार्य करण्यात येणार आहे.
या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उपक्रमासाठी जामखेड नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी अजय साळवे हे चार्ज ऑफिसर म्हणून कार्य पाहत आहेत. तसेच जनगणना अधिकारी महेश शेकडे, अमीर शेख, महेश कवादे आणि अतुल राळेभात यांनी मोहिमेचे उत्कृष्ट नियोजन केले आहे.
घरगणना मोहिमेत एकूण 80 प्रगणक शिक्षक, 13 पर्यवेक्षक तसेच नगरपरिषद जनगणना विभागातील 3 कर्मचारी प्रत्यक्ष सहभाग घेणार आहेत. या माध्यमातून घरांची माहिती संकलित करणे, नकाशे तयार करणे, कुटुंबीयांची आवश्यक माहिती नोंदविणे आदी महत्त्वाची कामे केली जाणार आहेत.
यावेळी मुख्य अधिकारी अजय साळवे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “जनगणना हे देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे कार्य असून प्रगणक शिक्षक घरी आल्यानंतर नागरिकांनी योग्य व अचूक माहिती देऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे.”
तसेच प्रगणक शिक्षक मयूर भोसले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “जनगणना हे राष्ट्रीय कर्तव्य असून ते यशस्वी करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. सर्वांच्या सहकार्याने घरगणनेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण करू.”
जामखेड नगर परिषद प्रशासन, शिक्षक व कर्मचारी यांच्या समन्वयातून ही जनगणना मोहीम प्रभावीपणे राबविली जात असून नागरिकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

Loading

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page