जामखेड बाजार समितीतून कांदा जाणार सातासमुद्रापार, दुष्काळजन्य परिस्थितीत शेतकऱ्यांना मिळणार चांगला आर्थिक आधार

जामखेड बाजार समितीतून कांदा जाणार सातासमुद्रापार, दुष्काळजन्य परिस्थितीत शेतकऱ्यांना मिळणार चांगला आर्थिक आधार

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीतून २४ नोव्हेंबर रोजी कांद्याचा एक ट्रेलर रवाना करण्यात आला

जामखेड प्रतिनिधी,

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारातील परवानाधारक असलेल्या जीवनदास ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कांदा परदेशी मार्केटमध्ये जात आहे. हा कांदा जामखेड ते दुबई, कतार, उमान, बरकत व इतर अन्य देशांमध्ये जाणारा असून काल दि. २४ नोव्हेंबर रोजी या कांद्याचा १ कंटेनर परदेशी मार्केटकडे रवाना करण्यात आला. यापूर्वीही या जामखेड बाजार समितीतून कांदा दुबईलाही गेलेला आहे. जामखेड बाजार समितीतील कांद्याला देश-प्रदेशात चांगली मागणी असून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या बाजार समितीत कांदा आणावा असे आवाहन कृषी उत्पन्न समितीचे सभापती शरद कार्ले यांनी केले आहे.

काल दि. २४ नोव्हेंबर रोजी बाजार समिती आवारात कंटेनरची विधी पूजा करून व नारळ फोडून हा कंन्टेनर परदेशी बाजारात जाण्यासाठी रवाना करण्यात आला. यावेळी जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद (दादा) कार्ले, बोर्ला गावचे माजी सरपंच जालिंदर चव्हाण, बाजार समितीचे संचालक राहुल बेदमूथा, जीवनदास ट्रेडिंग कंपनीचे मालक व कांदा उत्पादक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जामखेड बाजारातला कांदा देश-प्रदेशात जात असून त्यास चांगला भाव मिळून शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या दुष्काळाजन्य परिस्थितीत चांगला आर्थिक आधार मिळत आहे. परिणामी जामखेड तालुक्याच्या भवताली असलेल्या चार ते पाच तालुक्यातून बाजार समिती आवारात मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक येत आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांना बाजार समितीमार्फत मिळणाऱ्या सुविधा, योग्य वजन, चांगला भाव, लगेच पेमेंट, तसेच आवश्यक त्या ईतर सर्व पुरवण्यात येत आहेत. याठिकाणी पारदर्शक पद्धतीने व्यवहार होत असल्यामुळे बाजार समिती क्षेत्रातील आणि शेजारील तालुक्यातील सुद्धा शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

यामुळे शेतकरी जामखेड बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतमाल आणत आहेत. तसेच कांद्याच्या आवकमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. शेतकऱ्यांनी खाजगी व्यापाऱ्यांकडून आपली फसवणूक टाळण्यासाठी आपला शेतमाल, भुसार किंवा कांदा बाजार समिती मध्येच विक्रीसाठी आणावा आणि बाजार समितीच्या परवानाधारक व्यापाऱ्यांशी व्यवहार करावा असे आवाहन यावेळी सभापती शरद कार्ले यांनी केले आहे.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles