*एवन टेक्सटाइल या भव्य वस्रदालनाचा विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते होणार शुभारंभ*
जामखेड प्रतिनिधी,
जामखेड तालुक्याच्या सामाजिक कार्यात वै.विठ्ठलराव (आण्णा) राऊत यांचे मोठे योगदान आहे , आण्णानी नेहमी शैक्षणिक , सामाजिक ,आर्थिक राजकीय व धार्मिक कार्यात कायम अग्रेसर भुमीका बजावली आहे , त्यांचे व बोराटे कुटुंबीयांचे जिव्हाळ्याचे नाते आणि यातुनच जामखेडच्या वैभवात भर पडत विजयादशमी दिवशी भव्य कपड्यांचे माहेर घर सुरु होणार आहे.
हे वस्रदालन चार मजली सुसज्ज असून दालन हे संपूर्णपणे वातानुकूलित असलेले शहरातील हे पहिले वस्रदालन आहे. या दालनात नाविन्यपूर्ण व्हरायटी, दर्जेदार वस्रसेवा हे या दालनाची वैशिष्ट्य आहेत.असून यामध्ये शूटिंग,शर्टींग, रेडिमेड, साडी आणखी बरंच काही या दालनामध्ये मिळणार आहे.
मंगळवार दिनांक २४ आॅक्टोबर रोजी प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता उद्घाटन होणार आहे या शुभारंभासाठी खा.डॉ सुजय विखे पाटील, आ. प्रा. राम शिंदे, आ. रोहित पवार, आ. सुरेश धस, ह. भ. प. प्रकाश महाराज बोधले, ह. भ. प. रामकृष्ण महाराज रंधवे, पं. पु. पांडुरंग शास्त्री देशमुख यांची उपस्थिती राहणार आहे. आता साइज, कमफर्ट, व्हरायटीची चिंता सोडा आता ब्रँडेड,योग्य किंमत आणि आपल्या साइज मध्ये सर्व वस्र उपलब्ध असतील. तेव्हा दसरा आणि दिवाळी होणार एवन टेक्सटाईल सोबत साजरी.
जामखेड व पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी या भव्य दालनाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित रहावे असे अवाहन बोराटे व राऊत परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.