*नगराध्यक्ष निखिल अप्पा घायतडक व दुर्गा महोत्सव समितीच्या वतीने नवरात्र उत्सवनिमित्त साजन बेंद्रे यांचा देवी लोकगीतांचा कार्यक्रम संपन्न*

जामखेड प्रतिनिधी,

जामखेड शहरात जुलिया हॉस्पिटल शेजारी करमाळा रोड जामखेड येथे नगराध्यक्ष निखिल (अप्पा ) मुकुंद घायतडक व दुर्गा महोत्सव समितीच्या वतीने नवरात्र उत्सवनिमित्त साजन बेंद्रे यांचा देवी लोकगीतांचा कार्यक्रम संपन्न मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी सर्व नवदुर्गांची पूजा करून  राजमाता जिजाऊ माँसाहेब पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले नवयुग प्रवर्तक दुर्गा माता यांचे श्री शक्तीचा जागर करूयात या प्रमाणे वार्ड क्र 20 व 21 मधील नागरिक व  मान्यवरांच्या हस्ते पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील जामखेड नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष विकास राळेभात राष्ट्रवादी तालुकाअध्यक्ष दत्तात्रय वारे विधानसभा अध्यक्ष प्रा.मधुकर आबा राळेभात,नगरसेवक अमित चिंतामणी,शेळके मामा, मोहरी माजी सरपंच भरत अहिर हर्षद शेख,विजय राजकर व नगराध्यक्ष निखिल आपा घायतडक मित्र परिवार व नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

  नवरात्र उत्सव हा श्री शक्तीचा जागर आणि दुर्गा माता, आंबे माता, जगदंबे माता यांचा उत्सव असून श्री शक्तीचा आदर तिथ्य केले पाहिजे आणि महिलांसाठी एक व्यासपीठ, आणि महिलांना देखील प्रत्येक कार्यक्रमात मानाच स्थान देण्याचा माझा प्रयत्न होता आणि इथून पुढे देखील असेच कार्यक्रम आपण घेणार व महिलांना मन सन्मान देणार, सामाजिक काम अशाच पद्धतीने सुरु राहील वार्डातील नागरिकांच्या काहीही अडीअडचणी असतील त्या सोडवण्याचा माझा प्रयत्न राहील माझ्या कार्यकाळात देखील मी गोरगरिबांची कामे मोठ्या प्रमाणात केली असे मत यावेळी नगराध्यक्ष निखिल आप्पा घायतडक यांनी व्यक्त केलं

यावेळी प्रसिद्ध गायक साजन बेंद्रे यांनी देवी गिते, समजप्रबोधन पर गाणी सादर केली, साजन बेंद्रे यांच्या गाण्याचा सदाबहार कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा झाला

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव कोल्हे सर केले तर आभार राकेश घायतडक यांनी मानलेतसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा निखिल आप्पा घायताडक मित्र मंडळ व दुर्गा माता संयोजन समितीने परिश्रम घेतलेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *