आमदार प्रा राम शिंदे यांच्या पाठपुराव्यातून जामखेड नगरपरिषदेसाठी 5 कोटींचा निधी मंजुर, दसऱ्याच्या मुहूर्तावर जामखेडकरांना मिळाले मोठे गिफ्ट

जामखेड :  नगरपरिषदांना वैशिष्टय़पूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेतून जामखेड नगरपरिषदेसाठी 5 कोटींचा निधी मंजुर झाला आहे. हा निधी मिळावा यासाठी आमदार प्रा राम शिंदे यांनी नगरविकास विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.  जामखेड नगरपरिषदेतील विविध विकास कामांना राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. याबाबतचा शासन निर्णय नगर विकास विभागाने जारी केला आहे.ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर आमदार प्रा.राम शिंदे यांनी जामखेड शहरवासियांसाठी 5 कोटी रूपयांच्या निधीचे मोठे गिफ्ट दिल्याने शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जामखेड नगरपरिषद क्षेत्रात विविध विकासकामे मार्गी लागावी यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी नगरविकास विभागाकडे विविध विकास कामांचे प्रस्ताव सादर केले होते. नगरपरिषदांना वैशिष्टय़पूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेतून सहा मोठ्या कामांना मंजुरी मिळाली आहे. यासाठी सुमारे 5 कोटी रूपयांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे. या निधीतून शहरातील महत्वाची कामे मार्गी लागणार आहेत. नगर विकास विभागाने 23 ऑक्टोबर 2023 रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे.

आमदार प्रा.राम शिंदे हे विधानपरिषद सदस्य झाल्यापासून त्यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील विकास कामे मार्गी लावण्याचा धडका लावला आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी कोट्यावधी रूपयांचा निधी मतदारसंघात आणला आहे. अजूनही अनेक विकास कामे मार्गी लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जामखेड नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातील महत्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी हाती घेतलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. सरकारने जामखेड नगरपरिषदेसाठी 5 कोटींचा निधी मंजुर केला आहे.

आमदार प्रा राम शिंदे यांच्या पाठपुराव्यातून जामखेड शहरासाठी मंजुर झालेल्या 5 कोटी निधीतून नागेश्वर मंदिर पुल रस्ता बांधकाम करणे, सुशोभीकरण करणे, दशक्रिया घाट बांधणे या कामासाठी 3 कोटी रूपयांचा निधी मंजुर झाला आहे. तसेच खंडोबा मंदिर परिसर सुशोभीकरण करणे कामासाठी 35 लाख रूपये, मल्लिकार्जुन मंदिर परिसर सुशोभीकरण करणे या कामासाठी 25 लाख रूपये, राम मंदिर परिसर सुशोभीकरण करणे या कामासाठी 40 लाख रूपये, लोहारदेवी मंदिर परिसर सुशोभीकरण करणे या कामासाठी 50 लाख रूपये, तर शादीखाना व ईदगाह मैदान सुशोभीकरण करणे या कामासाठी 50 लाख रूपये असा निधी मंजुर करण्यात आला आहे.

जामखेड शहराचे ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिरा समोरील नदीवर पुल बांधला जावा तसेच नदीघाट उभारावा ही गेल्या अनेक वर्षांची शहरातील नागरिकांची मागणी आमदार प्रा.राम शिंदे यांनी पुढाकार घेत मार्गी लावली. यासाठी 3 कोटी रूपयांचा भरघोस निधी मंजूर केला. आमदार प्रा राम शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयांमुळे नागेश्वर भक्तांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.

जामखेड शहरातील मुस्लिम बांधवांसाठी शादीखाना असावा ही गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती. या मागणीची आमदार प्रा.राम शिंदे यांनी गंभीर दखल घेतली. मुस्लिम बांधवांसाठी जामखेड शहरात शादीखाना असावा हे स्वप्न आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे पूर्णत्वास आले आहे. जामखेड शहरात शादीखाना व्हावा यासाठी व ईदगाह मैदानाचे सुशोभीकरण करण्याच्या कामासाठी आमदार प्रा राम शिंदे यांच्या माध्यमांतून 50 लाख रूपयांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे.

जामखेड शहरात मुस्लिम समाजासाठी शादीखाना असावा अशी मागणी महाविकास आघाडी सरकारच्या काळात वारंवार करण्यात आली होती. परंतू या मागणीला यश आले नव्हते. मात्र आमदार प्रा राम शिंदे हे विधानपरिषद सदस्य झाल्यानंतर जामखेड शहरातील मुस्लिम बांधवांनी आमदार प्रा राम शिंदे यांची भेट घेऊन मुस्लिम समाजासाठी शादीखाना मंजुर करण्यात यावा, अशी आग्रही मागणी धरली होती. आमदार प्रा राम शिंदे यांनी तातडीने या मागणीची दखल घेऊन महायुती सरकारच्या माध्यमांतून मुस्लिम समाजाला न्याय मिळवून देत शादीखाना व ईदगाह मैदान सुशोभीकरण या कामांना मंजुरी मिळवली आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांनी मुस्लिम समाजाची महत्वाची मागणी मार्गी लावत समाजाला न्याय मिळवून दिला. यामुळे मुस्लिम समाजाला पुन्हा एकदा आपला तो आपलाच असतो याची प्रचिती आल्याची चर्चा आता जामखेडमध्ये रंगली आहे.

चौकटीसाठी

जामखेड नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात विविध धार्मिक स्थळांचा विकास व्हावा अशी शहरातील नागरिकांची मागणी होती. त्यानुसार नगरविकास विभागाकडे याबाबतचे प्रस्ताव दाखल केले होते. नगरपरिषदांना वैशिष्टय़पूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेतून जामखेड नगरपरिषदेला 5 कोटींचा निधी मंजुर झालाय. शहरातील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी यानिमित्ताने पुर्ण होणार आहे. जामखेड शहरासाठी 5 कोटींचा निधी मंजुर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील तसेच महायुती सरकारचे मनापासून आभार!

    *– आमदार प्रा.राम शिंदे*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *