संथगतीने व अरुंद आलेल्या रस्त्यावर पुन्हा घडला आपघात, मोटारसायकल अपघातात आडत व्यापाऱ्याचा मृत्यू.
आता तरी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकारी व ठेकेदारांना जाग येणार का?
जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथील आडत व्यापारी अतिष पवार यांच्या मोटारसायकलला समोरुन येणाऱ्या चारचाकी वाहनाने जोराची धडक दिल्याने या अपघातात अतिष पवार यांचा जागीच मृत्यू झाला आहे. संथ गतीने सुरू आसलेल्या व एकेरी वाहतुक असल्याने हा आपघात घडला आहे. परीणामी आतातरी संबंधित राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकारी व ठेकेदार यांना जाग येणार का असा प्रश्न नागरीकांना पडला आहे.
आतीष भागवत पवार हे बुधवारी रात्री ९ वा. जामखेड वरून बीड रोडने मोटारसायकल वर चालले होते. तर बीड रोडने चारचाकी वहान वेगाने जामखेड कडे येत होते. याच दरम्यान एका हाॅटेल जवळ चारचाकी वहान व मोटारसायकल यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात मोटारसायकल वरील आतीष भागवत पवार हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने जामखेड येथिल खाजगी हॉस्पिटलला दाखल करण्यात आले होते मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. नंतर त्यांच्यावर रात्री ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आले.
बीड रोडवर घटनास्थळी ताबडतोब जामखेड पोलीस दाखल झाले त्यांनी घटनेचा पंचनामा केला तसेच चारचाकी वहान पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. आतीष भागवत पवार यांच्या निधनाची वार्ता कळताच संपूर्ण जामखेड परिसरात शोककळा पसरली तसेच आज जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आज लिलाव बंद ठेवण्यात आले होते. आतीष पवार यांचे सहा महिन्यांपुर्वीच लग्न झाले होते. त्यांच्या मागे पत्नी, आई वडील तसेच चुलते व चुलत भाऊ असा मोठा परिवार आहे.
सध्या जामखेड ते सौताडा या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र हे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने सध्या बीडरोडने एकरी वहातुक सुरू केली आहे. परीणामी अरुंद रस्ता आसल्याने वहाने वेगाने ये जा करत आहेत त्यामुळेच हा आपघात घडला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. मात्र आतातरी संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना जाग येणार का व या कामाला वेग येणार का हे पहावे लागणार आहे.