विज्ञान- गणित -पर्यावरण प्रदर्शनाचा मुख्य उद्देश बाल वैज्ञानिक घडवने होय – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे
जामखेड प्रतिनिधी,
विद्यार्थी जीवनात मन लावून अभ्यास करावा. गणित विज्ञान पर्यावरण प्रदर्शनाचा मुख्य उद्देश बालवैज्ञानिक घडवणे हा होय. पुस्तकी ज्ञानाला व्यवहाराची जोड द्यायला हवी. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांची कल्पकता नवनवीन निर्मिती घडते.
प्रत्यक्ष कृतीतून अध्ययन विद्यार्थ्यांनी केले पाहिजे. शिकत असताना प्रात्यक्षिक कार्यावर देखील भर दिला पाहिजे. हे प्रदर्शन तीन दिवस आहे तरी सर्व तालुक्यातील विद्यार्थ्यांनी प्रदर्शन पाहण्यासाठी यावे असे मार्गदर्शन प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी केले .
48 वे जामखेड तालुका गणित विज्ञान व पर्यावरण प्रदर्शनाचे उद्घाटन श्री नागेश विद्यालय उत्साहात संपन्न.
रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय जामखेड मध्ये शिक्षण विभाग पंचायत समिती, जामखेड तालुका गणित विज्ञान अध्यापक संघटना व श्री नागेश विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने
48 वी जामखेड तालुका विज्ञान गणित व पर्यावरण प्रदर्शना चे आयोजन करण्यात आले.
दिनांक 20 ,21 व 22 या तीन दिवशी हे प्रदर्शन पाहण्यासाठी खुले आहे . कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजन करून सुरुवात केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे साहेब व प्रमुख उपस्थिती
नागेश विद्यालय स्कूल कमिटी सदस्य हरिभाऊ बेलेकर, कन्या विद्यालय स्कूल कमिटीचे सदस्य मधुकर राळेभात, विनायक राऊत , प्रकाश सदाफुले , शिवाजीराव ढाळे, बाजीराव गर्जे ,प्रवीण गायकवाड, दशरथ कोपनर नवनाथ बडे ,सुरेश मोहिते, भाऊसाहेब इथापे, भरत लहाने, आप्पा शिरसाठ ,श्रीधर जगदाळे प्राचार्य मडके बी के ,मुख्याध्यापिका चौधरी के , प्रा कैलास वायकर, प्राध्यापक विनोद सासवडकर, शिव सोळंके ,सचिन मोकाशी, निकम महाराज , कुंडल राळेभात ,राजेंद्र गोरे , मोहन पवार , अमोल गिरमे, संतोष ससाने ,साळुंखे बी एस, रघुनाथ मोहोळकर,संजय हजारे, एनसीसी ऑफिसर मयुर भोसले ,आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य मडके बी यांनी केले.
यावेळी शिवाजीराव ढाळे, श्रीधर जगदाळे हरिभाऊ बेलेकर, प्राध्यापक मधुकर आबा राळेभात यांनी मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री नागेश विद्यालय येथील सर्व स्टाफ यांनी मेहनत घेतली.
सूत्रसंचालन संभाजी इंगळे, स्वाती अभंग आभार प्रदर्शन संतोष ससाणे यांनी केले