समाज जगला तर राजकारण जगेल- ॲड.डॉ.अरुण (आबा) जाधव

*समाज जगला तर राजकारण जगेल*
ॲड.डॉ.अरुण (आबा) जाधव

आज दि.12 सप्टेंबर रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यभूमी चोंडी या ठिकाणी सहा दिवसापासून सुरू असलेल्या यशवंत सेना महाराष्ट्र राज्य 70 वर्षे सहन केले आता सहन करणार नाही धनगर समाजाची आरक्षण अंमलबजावणी  केल्याशिवाय थांबणार नाही या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. डॉ.अरुण आबा जाधव भटक्या कार्यकर्त्यासह चोंडी या ठिकाणी गेले होते.


अण्णासाहेब रुपनवर,सुरेश बंडगर,बाळासाहेब दोडतले,अक्षय शिंदे,दांगडे सर,समाधान पाटील, नितीन धायगुडे,या उपोषणकर्त्यांची तब्येतीची विचारपूस केली.त्यांना आधार दिला व म्हणाले धनगर समाजाचा लढा हा संविधानिक आहे आपल्या देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी या धनगर बांधवाने जीवाचे बलिदान केले आहे. ज्यांनी इंग्रजांची गुलामी केली ते या देशाचे मालक झाले येत्या 18 ते 22 सप्टेंबर 2023 मधील संसदेच्या विशेष अधिवेशनात धनगर आरक्षणाचा वटहुकूम काढून समाजाला न्याय दिला पाहिजे असे अरुण आबा म्हणाले
    यावेळी वैजीनाथ केसकर (तरडगाव सरपंच) संतोष चव्हाण विशाल पवार (आदिवासी नेते) यांनी समाजाच्या वतीने पाठिंबा दिला आबासाहेब मोरे,राजू शिंदे,अरविंद मंडलिक,अविनाश काळे उपस्थित होते

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page