जामखेडमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने सुरु करणार साखळी उपोषण-मंगेश (दादा) आजबे

जामखेडमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने सुरु करणार साखळी उपोषण-मंगेश (दादा) आजबे

मनोज जरांगे यांची भेट घेऊन मंगेश (दादा)आजबे यांनी दिला उपोषणास पाठींबा

जामखेड प्रतिनिधी

जालना जिल्ह्य़ातील अंतरवाली सराटी गावात लोकशाही मार्गाने मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज १६ वा दिवस आहे. यांच्या उपोषणास पाठींबा देण्यासाठी नुकतेच मंगेश (दादा) आजबे यांनी अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या उपोषण जामखेड सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देऊन पाठींबा दिला. जरांगे यांचे आंदोलन संपले नाहीतर लवकरच जामखेड तालुक्यातील मराठा बांधवांच्या सोबत साखळी उपोषण करण्याचा इशारा मंगेश (दादा) आजबे यांनी दिला आहे .

अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील उपोषणास बसले त्यांना पाठिंबा व मराठा आरक्षणासाठी संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मात्र आंदोलकांवर वरिष्ठ आदेशावरून मराठा बांधवांवर दडपशाही केली आणि अमानुष लाठीहल्ला निंदनीय होता. यात महीला ,लहान मुले , व म्हातारे कोणालाही सोडले नाही. आया बहीणीचे रक्त सांडले. शांततापूर्ण सुरु आसलेले आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला . या प्रकरा विरोधात राज्यसरकार आणि हल्लाचा आदेश देणाऱ्यांच्या विरोधात व मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत. महाराष्ट्रातुन देखील जरांगे पाटील यांना भेटुन पाठींबा देण्यासाठी हजारो मराठा बांधव चारचाकी व दुचाकी व पायी चालत अंतरवाली सराटी गावात येत आहेत.

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठींबा देण्यासाठी नुकतीच सकल मराठा समाजाच्या चे मंगेश (दादा) आजबे यांच्या वतीने अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांची भेट घेऊन व निवेदन देऊन पाठींबा दिला. तसेच मनोज जरांगे यांचे उपोषण व आंदोलन संपले नाहीतर लवकरच जामखेड तालुक्यातील प्रत्येक गावात व जामखेड शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करणार आहेत आशी माहिती मंगेश (दादा) आजबे यांनी दिली.

निवेदन देता वेळी अंतरवाली सराटी या ठीकाणी सकल मराठा समाजाचे मंगेश दादा आजबे, बावी चे सरपंच निलेश पवार, सुंदरदास बिरंगळ, अनिल भीसे व अविनाश बोधले उपस्थित होते.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page