*वाचनाने माणूस समृद्ध होतो-भारतीसाहेब API जामखेड*

*साईनगर येथे संपन्न झाला MBBS मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार..*.

जामखेड प्रतिनिधी

जामखेडचे API भारती साहेब यांच्या हस्ते साईनगर मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न झाला.साईनगर येथील सौरभ काकडे,याची MBBS कॉलेज बारामती येथे शासकीय कोट्यातून निवड झाली, रोहन निकम याची MBBS कॉलेज सोलापूर येथे निवड झाली.योगेश‌ खेत्रे याची BSC agri कॉलेज बारामती व प्राजक्ता हजारे हिने उत्तम गुण मिळवून BAMS चे शिक्षण पुर्ण केले. त्याबद्दल साईनगर वासियांनी त्यांचा सत्कार केला.यावेळी अनेक मान्यवरांनी व सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी भारतीसाहेब यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले,” पुस्तक वाचायला हवी. वाचनाने माणूस समृद्ध होतो.याची अनेक उदाहरणे त्यांनी दिली.इयत्ता सहावीतील त्यांच्या जीवनातील वाचनामुळे मी शिक्षकांच्या तावडीतून कसा वाचलो.

हा प्रसंग सांगितला.तसेच शालेय अभ्यासक्रम तुम्हाला पैसा कमवायला कामी येईल तर अवांतर वाचन तुम्हाला एक चांगला माणूस घडविल.” असे भावोद्गार त्यांनी याप्रसंगी काढले.यावेळी मॅथ्स वर्ल्ड क्लासेसचे संचालक भोसले सर व सर्व साईनगरवाशी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *