*कोणत्याही क्षेत्रात माता पिता व गुरूच तुमचे जीवन घडवू शकतात. तुम्ही कोणताही खेळ निवडा. मात्र यश मिळवायचे असेल तर संघर्ष करावाच लागतो-डायरेक्टर महाबली सतपालजी सिंह*

*मल्लविद्या संस्कार कुस्ती फाऊंडेशन जामखेडच्या वतीने जामखेड येथे खुली राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धा २०२४ संपन्न*

जामखेड प्रतिनिधी,

कोणत्याही क्षेत्रात माता पिता व गुरूच तुमचे जीवन घडवू शकतात. तुम्ही कोणताही खेळ निवडा. मात्र यश मिळवायचे असेल तर खुप संघर्ष करावा लागतो. कुस्ती क्षेत्रात मला जो मान, सन्मान व पैसा मिळाला तो आपल्या महाराष्ट्रातून, या खेळातून अर्जुन पुरस्कार विजेते पै. राहुल आवारे सारखे यशस्वी मल्ल घराघरात निर्माण व्हायला हवेत.

मी १० वेळा हिंद केसरी किताब मिळविला असला तरी तुमच्या सारखा ग्रामीण भागातूनच या क्षेत्रात आलेलो आहे. मी माझ्या आयुष्यात ३००० कुस्त्या खेळलो. १९७० च्या दशकात लोक लाखो लोक माझी कुस्ती पाहायला यायचे तेही तिकीट काढून. तेव्हाही पाच-पाच लाखांची कुस्ती असायची. आज पर्यंत भारताला कुस्ती जे पाच मेडल मिळाले आहेत. ते सर्व माझे खेलाडू आहेत. तुम्हीही संघर्ष केला तर यश मिळने अवघड नाही. आज या ठिकाणी स्थापन झालेल्या मल्लविद्या कुस्ती फाऊंडेशनच्या कुस्ती संस्कार केंद्रातून जागतिक चॅम्पीयन्स व सुवर्ण पदक विजेते खेलाडू निर्माण व्हावेत असेही मत भारत सरकारचे स्पोर्ट्स डायरेक्टर महाबली सतपालजी सिंह यांनी व्यक्त केले.

     जामखेड येथे स्व. विष्णू वस्ताद काशीद यांच्या स्मरणार्थ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ माँसाहेब, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त मल्लविद्या संस्कार कुस्ती फाऊंडेशन जामखेडच्या वतीने जामखेड येथे खुली राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धा २०२४ पारितोषिक वितरण समारंभ व  मल्लविद्या संस्कार कुस्ती फाऊंडेशन संकुलाचा भुमिपूजन या कार्यक्रम पार पडला.

यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महंत महादेवानंद शास्त्री महाराज (अध्यक्ष, अश्वलिंग देवस्थान, पिंपळवाडी), महाबली सतपालजी सिंह (स्पोर्टस् डायरेक्टर, दिल्ली), सिने अभिनेते राहुल सोलापूरकर, पंढरीनाथ (अण्णा) पठारे (कुस्तीमहषी, पुणे), ) महाराष्ट्र केसरी पै. छोटा रावसाहेब मगर, पै. गुलाब बर्डे, अर्जुन पुरस्कार विजेते पै. राहुल आवारे, जिल्हा परिषद सदस्या राणीताई निलेश लंके,  छत्रपती पुरस्कार विजेते बाळासाहेब आवारे, पै. गोकुळ आवारे, माजी आमदार भीमराव धोंडे, युवराज काशिद (अध्यक्ष, मराठी भाषिक संघ, इंदौर), राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर  राळेभात, महाराष्ट्र कामगार केसरी पै. पंडित साबळे, नवनिर्वाचित पोलीस उपनिरीक्षक गायत्री राळेभात, संतोष जाधव (तळेगाव दाभाडे), भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, मोहन पवार गुलाब जांभळे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, खेळाडू, स्पर्धक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

राजर्षी शाहू महाराजांनी ज्या विचारातून कुस्ती जगभर पोहचवली त्याच विचारातून मल्ल विद्या फाऊंडेशनेने ग्रामीण भागात हे मल्ल विद्या संस्कार केंद्र सुरू करणे हा वेगळा विचार आहे. कुस्ती शिकवण्याबरोबर संस्कार करणे हा विचार पाहून आनंद वाटला. शहरी भागात डमी संस्कृती वाढत असताना ग्रामीण भागात संस्कार केंद्र उभे राहणे म्हणजे सत्यतेचे व त्यागाचे प्रतिक व अभिमानाची बाब आहे. आज या ठिकाणी कुस्ती क्षेत्रातील दिग्गज आले आहेत. या ठिकाणाहून उत्तम दर्जाचे पहिलवान निर्माण व्हावे ज्यांनी या मल्ल विद्या संस्कार केंद्राचे नाव जगभर पोहचवावे असे प्रतिपादन सिने अभिनेते राहुलजी सोलापुरकर यांनी व्यक्त केले.

यावेळी पंढरीनाथ (अण्णा) पठारे, पै. राहुल आवारे, राणीताई निलेश लंके, गायत्री राळेभात, माजी आमदार भीमराव धोंडे या मान्यवरांनीही आपली मनोगते व्यक्त केली.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक बबन (काका) काशिद यांनी सूत्रसंचालन, प्रसिद्ध निवेदक पत्रकार निलेश दिवटे तर आभार प्रा. मधुकर राळेभात यांनी मानले. यावेळी प्रसिद्ध व्यवसाईक देविचंद डोंगरे यांनी उत्तम प्रकारे जेवाण व्यवस्था केली होती.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरणा बरोबरच काल झालेल्या पत्रकार दिनानिमित्त पत्रकार निलेश दिवटे, संजय वारभोग, अशोक वीर व धनराज पवार यांचाही सत्कार करण्यात आला.

आपल्या जामखेड तालुक्यातील व मल्लविद्या कुस्ती संस्कार केंद्रातील मल्ल देशविदेशात चमकावेत यासाठी सिने अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी दोन लाख, कुस्तीचे पोशिंदे आण्णासाहेब पठारे यांनी पाच लाख, माजी आमदार भीमराव धोंडे यांनी दोन लाख व भगिनी सिताबाई काशिद यांनी एक लाख, संतोष जाधव (तळेगाव दाभाडे, पुणे) यांनी पन्नास हजार रूपयांची देणगी जाहीर केली. तरी या कार्यासाठी दानशूर व्यक्तींनी आणखी पुढे यावे.

बबन (काका) काशिद
अध्यक्ष : मल्लविद्या कुस्ती फाऊंडेशनच्या

मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशन आयोजित भव्य राज्यस्तरीय खुली मॅरेथॉन स्पर्धा 2024 चे निकाल
21 किमी पुरुष खुलागट
प्रथम – ज्ञानेश्वर भालसिंग (अ.नगर) 21000 रु,
द्वितीय – प्रदीप राजपूत( कोल्हापूर)11000रु
तृतीय – ग्रंदसिंग चंदेल ( पुणे) 7000 रु
चौथा – सार्थक काळेल (सातारा) 5000रु
पाचवा- किशोर मरकड( अ नगर) 3000रु


10 किमी खुला गट महिला
प्रथम – आरती बाबर (सातारा ) 11000 रु,
द्वितीय – संतोषी नरळे( सातारा )7000रु
तृतीय – अंजली काळेल( सातारा) 5000 रु
चौथा – विशाखा बास्कर (अ नगर ) 3000रु
पाचवा- राजनंदिनी सुरवसे( अ नगर) 2000रु
5 किमी सोळा वर्षाच्या खालील मुले
प्रथम – ओंकार आव्हाड (आष्टी) 5000 रु,
द्वितीय – अमित जाधव ( जामखेड )3000रु
तृतीय – चेतन ढवळे  ( हळगाव) 2000 रु
5 किमी सोळा वर्षाच्या खालील मुली
प्रथम – अनुष्का वाळुंजकर (नान्नज ) 5000 रु,
द्वितीय –  गीतांजली वाळुंजकर (नान्नज)3000रु
तृतीय – अनुष्का बावडकर (जामखेड) 2000 रु
वरिष्ठ गट 50 वर्षांपुढील पुरुष
प्रथम – बबन नाईक (जामखेड ) 5000 रु,
द्वितीय –  दत्तात्रय आजबे ( जामखेड )3000रु
तृतीय – शिवाजी खंडागळे ( जामखेड ) 2000 रु
वरिष्ठ गट 35 वर्षांपुढील महिला
प्रथम – सविता पवार  (जामखेड) 5000 रु,
द्वितीय – म्हस्के मनिषा ( जामखेड )3000रु
तृतीय – निकम सीमा ( जामखेड) 2000 रु
विजेत्या स्पर्धकांना भव्य ट्रॉफी  मेडल प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *