भारतीय जनता पार्टीच्या जामखेड शहराध्यक्षपदी पवनराजे राळेभात
जामखेड प्रतिनिधी,
दोन दिवसा पुर्वीच राष्ट्रवादीतुन भाजप मध्ये प्रवेश केलेल्या कै. महादेव (आप्पा) राळेभात यांचे पुत्र युवा कार्यकर्ते पनवराजे राळेभात यांची नुकतीच भारतीय जनता पार्टीच्या जामखेड शहर अध्यक्षपदी निवड झाली आहे. यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पवनराजे राळेभात यांनी दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस मधुन भाजप मध्ये शेकडो कार्यकर्त्यांनसह आ.प्रा.राम शिंदे यांच्या उपस्थितीत चौंडी येथे प्रवेश केला होता. हा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का मानला जात आहे.
यानंतर दोनच दिवसात पवनराजे राळेभात यांची जामखेड शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आली. त्यांना नुकतेच आ. प्रा. राम शिंदे यांच्या आदेशाने भाजपा तालुका अध्यक्ष अजय (दादा) काशिद यांनी त्यांच्या सहीचे नियुक्ती पत्र दिले. या नंतर त्यांचा भारतीय जनता पार्टी जामखेडच्या वतीने आ. प्रा.राम शिंदे यांच्या भाजप कार्यालयात भव्य असा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना पवनराजे राळेभात यांनी बोलताना सांगितले की देशात व राज्यात भाजपची सत्ता आहे. देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तर आ. प्रा राम शिंदे यांच्या माध्यमातून जामखेड शहराचा विकास करावयाचा आहे.
तसेच मला जे पद दिले त्याचा मी योग्य असा उपयोग करुन पक्षातील प्रत्येक कार्यकत्यांना विश्वासात घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल. तसेच जामखेड तालुक्यात भारतीय जनता पक्ष वाढीसाठी प्रामाणिक पणे प्रयत्न करेल.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष अजय (दादा) काशिद, सभापती शरद कार्ले, नगरसेवक अमित चिंतामणी, माजी शहराध्यक्ष सोमनाथ राळेभात, माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, बिभीषन धनवडे, बापुराव ढवळे, डॉ ज्ञानेश्वर झेंडे, प्रविणशेठ चोरडीया, लहु शिंदे, ॲड प्रविण सानप, विष्णु गंभीरे, डॉ गणेश जगताप, पांडुरंग उबाळे, नंदु गोरे, दत्ता शिंदे, विष्णु भोंडवे, व तात्याराम पोकळे सह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.