श्री.अच्युत शिंदे सर यांना एलआयसी विमा क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा एमडीआरटी पुरस्कार जाहीर
जामखेड प्रतिनिधी,
पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील श्री.अच्युत शिंदे सर यांचा भारतीय आयुर्विमा महामंडळ एलआयसी पुणे विभागाच्या वतीने विमा विक्री व्यवसाय करून एम डी आर टी हा Lic विमा क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा पुरस्कार मिळवत अमेरिका USA येथे होणाऱ्या जागतिक विमा परिषदेसाठी निवड झालेली आहे.
गेले कित्येक वर्ष विमा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी कामगिरीबद्दल हा पुरस्कार प्रदान केला जातो.
श्री.अच्युत शिंदे सर यांच्या कार्याची दखल घेत भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या Lic च्या वतीने पुणे विभागाचे वरिष्ठ मंडल प्रबंधक श्री संदीप मोघे सर,विपणन प्रबोधक श्री उदय सुदुमब्रेकर सर,
प्रबंधक श्री केकरजवळेकर सर,जामखेड चे शाखा अधिकारी श्री गणेश औटी साहेब, विकास अधिकारी प्रसाद पोतदार साहेब यांच्या उपस्थितीत पुणे येथे हॉटेल सिझन येथे या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आत्मविश्वासाच्या जोरावर तसेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कार्य केले तर यश हमखास मिळतेच असे श्री.शिंदे सर यांचे अनुभव सांगतात. हे यश मिळवण्यासाठी देखील खूप प्रयत्न करावे लागले.
यासाठी विशेष मार्गदर्शन जामखेड so चे शाखा अधिकारी गणेश औटी साहेब, जामखेड so विकास अधिकारी प्रसाद पोतदार साहेब याचे मोलाचे मार्गदर्शन लाभले….