मा. मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या शुभहस्ते दूरदृश्य प्रणाली द्वारे महाराष्ट्रातील सर्व पी एम विश्वकर्मा कौशल्य विकास केंद्र ,चा उद्घाटन सोहळा संपन्न. . .
जामखेड प्रतिनिधी,
दिनांक 1फेब्रुवारी 2024 गुरुवार रोजी पीएम विश्वकर्मा कौशल्य विकास केंद्रचा उद्घाटन सोहळा ऑनलाइन / दूरदृष्टी प्रणाली द्वारे संपन्न झाला महाराष्ट्रातल्या 34 जिल्ह्यांमध्ये 101 प्रशिक्षण केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये पारंपारिक व्यवसायात काम करणाऱ्या व्यावसायिक कारागिरांना म्हणजेच विश्वकर्मांना अत्याधुनिक कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी पी एम विश्वकर्मा योजनेद्वारे 18 विविध पारंपारिक व्यवसाय उदा. शिवणकाम ,सुतारकाम, लोहारकाम , गवंडीकाम,खेळणी कारागीर, विणकाम,कुंभार,चर्मकार इत्यादी व्यवसायाचे आधुनिक कौशल्य विकास प्रशिक्षण काळाची गरज आहे व भारतामध्ये होण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून पीएम विश्वकर्मा योजना द्वारे पारंपारिक व्यवसाय कारागीर / विश्वकर्मांना आधुनिक प्रशिक्षण, आधुनिक अवजारे संच खरेदीसाठी अर्थसहाय्य व व्यवसाय वृद्धीसाठी अल्प व्याज दराने अर्थसहाय्य मिळणार आहे.
यासाठीच ही कौशल्य विकास केंद्र सगळीकडे उपलब्ध करून देण्यात आली आहेत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र जामखेड या संस्थेमध्ये पारंपारिक व्यवसाय – शिवणकाम ( दर्जी )या व्यवसाय अभ्यासक्रमाची सुविधा ग्रामीण तसेच शहरी भागातील शिवणकाम करणाऱ्या वय18 वर्ष पूर्ण महिला व पुरुष जे मागील पाच वर्षापासून त्या व्यवसायामध्ये काम करणाऱ्या कामगार / विश्वकर्मांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या ऑनलाइन ग्राहक सेवा केंद्रा मध्ये जाऊन आपली पीएम विश्वकर्मा योजनेसाठी नोंदणी करावी असे आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे यांनी यावेळी केले.
या उद्घाटन सोहळ्यास कौशल्य विकास रोजगार व नाविन्यता विभागाचे मंत्री माननीय श्री मंगल प्रभात जी लोढा हे देखील उपस्थित होते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामखेड येथील संगणक लॅब मध्ये ऑनलाइन प्रक्षेपित केल्या जाणाऱ्या या उद्घाटन कार्यक्रमास श्री सुपेकर उत्तरेश्वर ( IMC सदस्य आयटीआय जामखेड ) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
तसेच श्री एके वाघ प्राचार्य आयटीआय जामखेड श्री के डी गायकवाड गटनिर्देशक ,श्री देवगुडे सर श्री तुमेदवार सर श्री सर श्री साळुंखे सरश्री हारदे सर श्री पोकळे सर श्री जायभाय सर श्री सानप सर शिक्षकेतर कर्मचारीवरिष्ठ लिपिक शिंदे सर चतुर्थ श्रेणी कर्मचारी चव्हाण , शिंदे भोजनेव श्रीमती भोसले मॅडम तसेच सर्व व्यवसायातील प्रशिक्षणार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते.