आजपासून संत वामनभाऊ गड येथे सुरू होत भव्य किर्तन महोत्सव.

संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त जमदारवाडी येथील गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन.

जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील जमदारवाडी येथील संत वामनभाऊ गड येथे सालाबाद प्रमाणे या वर्षही भव्य दिव्य अशा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाच आज शनिवार दिनांक ३/२/२०२४ रोजी प्रारंभ.

महाराष्ट्रातील नामांकित किर्तनकारांच्या किर्तन सेवा संपन्न होणार आहेत दररोज सात नऊ किर्तन व नंतर सर्व भाविक भक्तांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

जामखेड तालुक्यातील जमदारवाडी सारोळा रोड लगत संत वामनभाऊ महाराज यांचे मंदिर आहे समोर भव्य असे प्रांगण सभोवताली झाडी आशा निसर्गरम्य वातावरणात मंदिर परिसरात पंचक्रोशीतील भाविक मोठय़ा प्रमाणावर दर्शनासाठी येत आसतात याच मार्गाने भाऊ दिंडी घेऊन पंढरपूरकडे जात होते आणि आजही ती परंपरा महंत विठ्ठल महाराजांच्या नेतृत्वात सुरू श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड ते पंढरपूर पायी दिंडीचे एकमेव गोल रिंगण संत वामनभाऊ गड जमादारवाडी येथे संपन्न होते ते पाहाण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी गडावर होत आसते.

संत वामनभाऊ महाराज यांनी आज्ञानी समाजाला जागृत करून जीवाच्या उध्दारासाठी भक्तीचा मार्ग दाखवला तसेच अडाणी समाजाला शिक्षणाची वाट दाखविली राज्यभर फिरून नारळी सप्ताह सुरू केले

भाऊंच्या पुण्यतिथी निमीत्त जमदारवाडी येथील गडावर श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य अशा अखंड हरिनाम सप्ताहाचे गेली आनेक वर्षे आयोजन करण्यात येते.
सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम
सकाळी ४ते ६ काकडा भजन,६ते७ महापुजा ७ते१० ज्ञानेश्वरी पारायण दुपारी ११ ते १गाथा भजन सायंकाळी ४ते ५ प्रवचन ५ते ६ हरिपाठ ७ते ९ हरिकिर्तन व त्यानंतर सर्वांसाठी पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी आणलेल्या भाकरी भाजीची महापंगत दररोज किर्तनानंतर होणार आहे.

*सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम*

शनिवारी राजाभाऊ महाराज कुलकर्णी यांचे प्रवचन तर सात ते नऊ या वेळेत श्रीहरी महाराज पुरी आष्टी यांचे कीर्तन होईल. रविवारी दत्ता महाराज खवळे यांचे प्रवचन होईल व सायंकाळी सात ते नऊ आसाराम महाराज बडे आळंदी यांचे कीर्तन होईल. सोमवारी अंगद महाराज ढोले यांचे प्रवचन तर सायंकाळी सात ते नऊ नारायण महाराज दौंड राजुरी यांचे कीर्तन होईल. मंगळवारी अर्जुन महाराज नेटके यांचे प्रवचन तर सायंकाळी शिवचरित्रकार आकाश महाराज भोंडवे यांचे कीर्तन होईल. बुधवारी दत्तात्रय महाराज डुचे यांचे प्रवचन तर राम महाराज शास्त्री आळंदी यांचे कीर्तन होईल.

गुरुवारी मच्छिंद्र महाराज राऊत यांचे प्रवचन तर सायंकाळी गहिनीनाथ महाराज खेडकर घाटशील पारगाव यांचे कीर्तन होईल. शुक्रवार दिनांक 14 रोजी दुपारी चार ते सहा दिंडी प्रदक्षिणा व सायंकाळी 9 ते 11 रघुनाथ महाराज चौधरी धामणगाव यांचे कीर्तन होईल शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते 11 श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचे महंत श्री विठ्ठल महाराज यांचे काल्याचे किर्तन होईल व त्यानंतर सार्वजनिक महाप्रसादाने संपूर्ण उत्सवाची सांगता होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *