भाजप व भाजपला मानणाऱ्या 6 सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांचा आमदार प्रा राम शिंदे यांच्या हस्ते सत्कार संपन्न !

चोंडीत पार पडला नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार !

*कर्जत-जामखेड : * कर्जत-जामखेड मतदारसंघात नुकत्याच 9 ग्रामपंचायतींच्या निवडणूक पार पडल्या. यामध्ये भाजपने 6 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले. तर काही ठिकाणी भाजप व मित्रपक्षांचे अनेक सदस्य निवडून आले. ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या भाजप व भाजपला मानणाऱ्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा आमदार प्रा राम शिंदे यांच्या हस्ते आज 11 नोव्हेंबर 2023 रोजी चोंडी येथील निवासस्थानी सत्कार करण्यात आला.

कर्जत व जामखेड तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी घवघवीत यश मिळवल्याबद्दल राज्याचे माजी मंत्री तथा आमदार प्रा राम शिंदे यांच्या हस्ते चोंडी येथील निवासस्थानी सत्कार करण्यात आला आहे. यावेळी 9 ग्रामपंचायतींपैकी 6 ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच व 9 ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते.

यामध्ये कर्जत तालुक्यातील खेड ग्रामपंचायतच्या सरपंचासह 6 सदस्य, गणेशवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचासह 9 सदस्य, वायसेवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचासह 7 सदस्य, औटेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचासह 4 सदस्य, कुंभेफळ ग्रामपंचायतीच्या सरपंचासह 7 सदस्य करमणवाडीचे 3 सदस्य, जामखेड तालुक्यातील जवळा ग्रामपंचायतचे 2 सदस्य तर मुंजेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचासह 4 सदस्य असे एकुण 42 ग्रामपंचायत सदस्य व 6 सरपंच अश्या 48 नवनिर्वाचित गाव कारभाऱ्यांचा आमदार प्रा राम शिंदे यांच्या हस्ते चोंडी येथील निवासस्थानी सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आला.

यावेळी खेडचे सरपंच अमित विलासराव मोरे पाटील, सदस्य सुनिल सोपानराव गायकवाड,  हनुमंत काकासाहेब रणवरे, मोहन एकनाथ शेटे, जयश्री सत्यवान शेटे, स्वाती अनिल काकडे, उज्वला महादेव वाघमारे यांचा त्यानंतर औटेवाडी ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच शशिकला मोरे यांचे पती महादेव मोरे, सदस्य देविदास आबासाहेब महाडिक, राहूल राजेंद्र ढवाण, महेंद्र ज्ञानदेव ढमे, बेबी जनार्धन मुरकुटे यांचे पती जनार्धन मुरकुटे यांचा सत्कार करण्यात आला.

त्यानंतर करमणवाडी ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सदस्य नितिन भगवान पावणे, रेखा नितिन पवार, ताईबाई प्रकाश मेहेर या तीन सदस्यांचातसेच गणेशवाडी ग्रामपंचायतचे सरपंच गणेश दादासाहेब पाडूळे, सदस्य गणपत पोपट कायगुडे, सौ सुनिता राजेंद्र खताळ, सौ तेजल संतोष दातीर, सौ सुजाता संतोष कायगुडे, शंकर बाबा डोंगरे, सुरेखा सुनिल मदने, विकी सत्यवान बारटक्के, दत्तात्रय बाळासाहेब कारंडे, विमल संजय दातीर, यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच वायसेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच मनिष पोपट हिरनवळे तर सदस्य महादेव अंकुश कायगुडे, मृणाली मल्हारी सुळ,  मनिषा दत्तात्रय पवळ, अशोक काशिनाथ पवळ, छाया नवनाथ भिसे, भिमराव पारूजी हिरनवळे तसेच कुंभेफळ ग्रामपंचायतचे सरपंच सौ प्रियंका संतोष धुमाळ, सदस्य – आश्विनी भाऊसाहेब धोदाड, मिनल रणजित धोदाड,  जहिर युन्नूस शेख, रामदास दशरथ दळवी, प्रेमा आण्णा धांडे, सौ दिपाली अनिल सावंत, सौ कृष्णाबाई हनुमंत नेटके, तसेच ताजू येथे पार पडलेल्या पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या सदस्या राजश्री निखील बनसोडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

जामखेड तालुक्यातील जवळा ग्रामपंचायतचे सदस्य प्रशांत भाऊसाहेब पवार पाटील, किसन दत्तात्रय सरोदे तसेच मुंजेवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच  राणी बाबासाहेब महारनवर, सदस्य स्वाती लहू देवमुंडे, बापू रामभाऊ बारस्कर, मोहन शामराव देवमुंडे, मुक्ताबाई विश्वास खाडे यांचा आमदार प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी जामखेड बाजार समितीचे सभापती शरद दादा कार्ले, बाजार समितीचे संचालक नंदकुमार गोरे, भाजपचे कर्जत तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, जिल्हाध्यक्ष गणेश पालवे, जिल्हा उपाध्यक्ष डाॅ सुनिल गावडे, जिल्हा सरचिटणीस सोमनाथ पाचरणे, पप्पुशेठ धोदाड, कैलास कायगुडे, हनुमंत मोरे, सह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

*चौकटीसाठी*

कर्जत व जामखेड तालुक्यात 9 ग्रामपंचायतींच्या निवडणूका नुकत्याच पार पडल्या. आज चोंडी निवासस्थानी कर्जत व जामखेड 6 सरपंचासह एकूण 48 नवनिर्वाचित ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. महायुती सरकारने घेतलेल्या सकारात्मक निर्णयांमुळे भाजप व महायुतीच्या पाठीशी जनता एकवटली आहे. हेच ग्रामपंचायत निवडणुक निकालातुन अधोरेखित होत आहे. एकुणच दावे प्रतिदावे करत असताना कोणाच्या किती ग्रामपंचायती आल्या हे सांगण्यापेक्षा आजच्या कार्यक्रमात दिसत असलेली उपस्थिती ‘हा सुर्य आणि हा जयद्रथ’ या माध्यमांतून आपल्याला पहायला मिळतेय. विकासासाठी मी नेहमीच सहकार्य करत असतो, यापुढे देखील अधिकचे सहकार्य राहिल. सर्व नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांना कुठलीही अडचण येणार नाही. सर्वांनी जोमाने काम करावे. जनतेने भाजपला भरभरून दिलेल्या यशामुळेच आजच्या सत्काराची संधी प्राप्त झाली. मतदारसंघातील जनतेचे मनापासून आभार !

* – आमदार प्रा.राम शिंदे.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *