अल्पवयीन मुलीवर अत्याचार अवघ्या 24तासात पोलिसांनी केली आरोपीला अटक
जामखेड प्रतिनिधी
सोशल मिडीयचा पुन्हा झाला गैरपवार सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली आणि मी तुला आयुष्यभर नीट सांभाळेल म्हणून शहरातील ऐका अल्पवयीन मुलीला फूस लाउन पळवून नेहले व तिच्यावर अत्याचार केला. मात्र पोलिसांनी अवघ्या 24तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या व मुलीला तिच्या आई वडिलांच्या ताब्यात दिले.
जामखेड पोलीस यांच्याकडुन मिळालेली सविस्तर माहिती अशी की, जामखेड शहरातील दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची आरोपी अनिकेत सचिन घोडेस्वार या 19 वर्षीय तरुणाशी सोशल मीडिया instagram च्या माध्यमातून ओळख झाली व दिनांक 15 August 2023 रोजी मुलगी ही सकाळी 11वाजता आपळ्या घरातून बाहेर गेली टी संध्याकाळी परत घरी आलीच नाही म्हणून तिच्या आई-वडिलांनी तिचा सर्व नातेवाईक मैत्रिणी यांच्याकडे शोध घेतला मात्र टी सापडली नाही
शेवटी दुसऱ्या दिवशी 16 August 2023 रोजी जामखेड पोलीस स्टेशनला आरोपी विरोधात मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल झाला.
पोलिसांनी आरोपी अनिकेत सचिन घोडेस्वार रा मिलिंदनगर व पीडित मुलगी हिचा अवघ्या 24 तासात शोध घेतला व पीडित मुलीकडे चौकशी केली असता तिने सांगितले की आरोपीची व माझी सोशल मीडिया इंस्टाग्रामवर ओळख झाली होती, त्यानंतर आरोपी याने पीडित मुलगी अल्पवयीन असून सुद्धा तिच्यावर बीड रोड वर MIDC ग्राऊंडवर नेले व मी तुला लाइफ टाइम संभाळीन असे म्हणत अत्याचार केला व आरोपीने लेहेनेवादी गावच्या शिवरातील शेतातील घरामध्ये नेहून देखील तिच्यावर अत्याचात केला अशी माहिती पीडित मुलीने पोलिसांना जबाबत दिली आहे
जामखेड पोलीस स्टेश्नाचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुनील बडे, पो कॉनस्टेबल सचिन पिरगल, पो कॉनस्टेबल विजय सुपेकर, व सचिन देवडे यांच्या पथकने तपास करत चोवीस तासाच्या आत 17 ऑगस्ट रोजी पहाटे आरोपीस अटक केली व मुलीला आई वडिलांच्या ताब्यात दिले व आरोपीस न्यायलयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस 21 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. व पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे करीत आहेत.