*भटके-विमुक्तांच्या विकासाचा जाहीरनामा सरकार दरबारी मांडणार*
ॲड डॉ अरुण जाधव
जामखेड (प्रतिनिधी)
जाती-जातीमध्ये फूट पडणाऱ्या जातीय विषमतेच्या चळवळी व धर्मांध वीचारातून होणाऱ्या समाजाची संक्रमण यामुळे देशातील सर्व सामान्य जनतेचे प्रश्न मागे पडत आहेत, यामुळे जामखेड येथील सर्वसामान्य भटके-विमुक्त दलित आदिवासी समाजाचे अनेक प्रश्न शासनाच्या समोर मांडण्यासाठी ग्रामीण विकास केंद्र संस्थाच्या वतीने जनतेचा जाहीरनामा परिषद हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
जनतेच्या जाहीरनामा परिषद कार्यक्रम ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी मा कडूदास कांबळे, उमाताई जाधव, अमित जाधव नगरसेवक, बजरंग ताटे, राजेश घोडे, तुकाराम कानडे,
उत्तम सावंत, सलीम मदारी, आजिनाथ शिंदे, मोहन चव्हाण,साहेबराव कानडे आदी मान्यवर विचारपीठ मंचावर उपस्थित होते.
यावेळी कडूदास कांबळे बोलताना म्हणाले की गेली 75 वर्षे झाले तरी आपला भटका समाज जातीचा दाखला नाही घर नाही रेशन नाही भाकर नाही असे प्रश्न मांडण्यासाठी भांडत आहे ,परंतु या समाजाने आता या राजकारण्यांकडे वेगळ्या प्रश्नांची मागणी केली पाहिजे यामध्ये प्रत्येक जातीच्या गृहनिर्माण संस्था उभ्या राहिल्या पाहिजेत भटक्यांच्या पुढार्यांचा साखर कारखाना झाला पाहिजे महाराष्ट्रातील प्रत्येक एमआयडीसीमध्ये भटक्यांच्या मुलांना दोन टक्के आरक्षण देऊन लवकर नोकर भरती केली पाहिजे
भटक्या सामाजातीला लोकांच्या शिक्षण संस्था उभा राहिल्या पाहिजेत अश्या प्रकारे यापुढील निवडणुकीत भटक्यांचा जाहीरनामा तयार करून आपले मत मागण्यासाठी येणाऱ्या पुढार्यांच्या हातात आपला जाहीरनामा दीला पाहिजे जो आपल्या मागण्या पूर्ण करीन त्याचं लोकप्रतिनिधींना मतदान द्यायचे असे आपण सर्व भटक्या समाजाने ठरवून या पद्धतीने आपला भटक्याचा अजेंडा तयार केला पाहिजे असे ते म्हणाले
बजरंग ताटे म्हणाले की भटक्यांच्या वेदना पाहून पोटात कालवील होते त्यांना गावात घर नाही गाव कोसाबाहेर राहावा लागते आपल्या भटक्या समाजातील मसनजोगी हा समाज गावातील मयत जाळण्याचे काम करतो त्याकामाचे त्यांना या शासनाकडून काय मोबदला दिला जातो, याचा विचार आपण करणे गरजेचे आहे, त्यासाठी या महाराष्ट्रामध्ये माझ्या भटक्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, यासाठी भटक्याच्या पुढाऱ्यांनी समाज जागृत केला पाहिजे,भटक्याच्या मुलांनी शिक्षण घेतले पाहिजे, महिलांनी सुद्धा संघटित होणे गरजेचे आहे आणि यापुढे भटक्याचा अजेंडा तयार करून राजकीय पुढाऱ्यांच्या हातामध्ये दिला पाहिजे असे ते म्हणाले
ॲड. डॉ अरुण जाधव बोलताना म्हणाले की भटक्याच्या अधिकारासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला आहे या देशांमध्ये माणसं मेल्यानंतर जाळली जातात त्या माणसांची सेवा करणाऱ्या मसन जोग्याला जागा दिली पाहिजे घर दिले पाहिजे आयुष्यभर दुसऱ्याच्या दारात जाऊन कलावंतांनी त्यांची कला सादर करून त्यांची करमणूक करण्याचे काम केले त्यांच्यासाठी महाराष्ट्रात आणखीनही बजेट नाही कल्याणकारी योजना नाहीत हा भटका समाज उघड्यावरती आहे यासाठी भटके विमुक्त 42 जातींनी एकत्र येऊन या राज्यकर्त्यांना भटक्याचा अजेंडा तयार करण्यासाठी सर्व ताकतीने महाराष्ट्रामध्ये भटक्याचं संघटन उभा करणे गरजेचे आहे.
यावेळी या परीषदेचे उद्घाटन मडक्याची उतरड फोडून व भारतीय संविधानाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले तर राष्ट्रगीताने परिषदेची सांगता झाली.
यावेळी नगरसेवक अमित जाधव, राजेश घोडे, विष्णुपंत मुजमुल्ले, विशाल पवार, तुकाराम कानडे, द्वारकाताई पवार, वैजीनाथ केसकर आदीची भाषणे झाली प्रास्ताविक बापूसाहेब ओहोळ यांनी केले, संतोष चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले,व सचिन भिंगारदिवे यांनी आभार मानले.
या परिषदेसाठी महाराष्ट्रातील अहमदनगर, उस्मानाबाद, बीड ,पुणे, सोलापूर ,लातूर , औरंगाबाद जिल्ह्यातून भटके विमुक्त समाजातील जवळपास 600 च्यावर महिला-पुरूष कार्यकर्ते उपस्थित होते,
कार्यक्रम यशस्वीतेसाठी नंदकुमार गाडे, अतीश पारवे, तुकाराम पवार, ऋषिकेश गायकवाड, डीसेना पवार ,काजुरी पवार, शुभांगी गोहेर, राजू शिंदे, रेश्मा बागवान, आलेश पवार, राहुल पवार, अर्चना भैलुमे, शहानुर काळे दिपाली काळे, रोहिणी राऊत, पल्लवी शेलार,उज्वला मदने, आदींनी परिश्रम घेतले