रत्नदीप मेडिकल संस्थेवर कडक कारवाईचे विद्यापीठ समितीचे अश्वासन

जामखेड प्रतिनिधी

विद्यार्थ्यांच्या मागण्या नुसार आज रत्नदीप मेडिकल कॉलेज व नर्सिंग होम साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे जि .रायगडचे व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नासिकचे कमिटी सदस्य यांना रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या तपासणी मध्ये आनेक त्रुटी आढळून आल्या.

तसेच या ठिकाणी धक्कादायक बाब म्हणजे समितीला नर्सिंग कॉलेजच आढळून आले नाही. त्यामुळे रत्नदीप मेडिकल संस्थेवर कडक कारवाईचे करण्याचे अश्वासन विद्यापीठ समितीच्या सदस्यांनी दिले.

गेल्या पाच दिवसांपासून रत्नदीप मेडिकल फौंडेशन चे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. काल पुणे विद्यापीठाची कमीटी येऊन गेल्या नंतर आज रायगड व नाशिक येथील कमिटीच्या सदस्यांनी उपोषणकर्त्यांच्या भावना जाणुन घेतल्या तसेच रत्नदीप मेडिकल कॉलेजची तपासणी केली या तपासणीमध्ये समितीच्या सदस्यांना आनेक त्रुटी आढळून आल्या होत्या.

कॉलेज मध्ये प्रवेश करताच रत्नदीप मेडिकलच्या व्यवस्थापनचा आडमुठेपणा दिसुन आला. चौकशीसाठी विद्यापीठ समिती येणार हे कळल्यावर कॉलेजला सूट्टी जाहीर केली. त्यामुळे चौकशी समिती आणि व्यवस्थापन व कॉलेज स्टाफचा संपर्क येऊ नये यासाठी खटाटोप केला. चौकशीसाठी आलेल्या आधिकाऱ्यांना दोन तास कॉलेजच्या गेटवर थांबावे लागले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे जि. रायगडचे डॉ विशाल पांडे, डॉ संतोष शेळके, डॉ ब्रिजेश आय्यर, डॉ एस आर भगत. तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नासिकचे विद्यार्थी कल्याण विभाग संचालक संदिप कुलकर्णी , डॉ अभय पाटकर प्रा नासिक, होमिओपॅथी काँलेज कोल्हापूरचे डॉ मिलिंद गायकवाड यांच्या समितीने कॉलेज मधुन फीरुन तपासणी केली मात्र या ठिकाणी त्यांना आनेक त्रुटी आढळून आल्या.

यानंतर समितीने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले की आपल्या तक्रारी व आमच्या तपासणी अहवालात आढळलेल्या त्रुटी या सर्व विद्यापीठास सादर करुन रत्नदीप मेडिकल फौंडेशन विरोधात विद्यापीठ कारवाई करणार असे अश्वासन देण्यात आले. आरोपीला अटक व कॉलेजची मान्यता जो पर्यंत रद्द करण्यात येत तो पर्यंत आमचे आंदोलन सुरूच रहाणार असे मत आंदोलनकर्त्या विद्यार्थींनी दिल्यायाने पाचव्या दिवशीही आंदोलन सुरूच आहे.

चौकट

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनींनी जामखेड तहसील कार्यालयासमोर गेल्या पाच दिवसांपासून रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या कथीथ कारभाराच्या विरोधात उपोषण व ठिय्या आंदोलन शांततेत केले आहे. परंतु पोलीस प्रशासनाने त्या नराधमाल आरोपीस तातडीने अटक करावी व विद्यार्थी विद्यार्थ्यांनीचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सर्व प्रशासनाने व विद्यापीठाच्या संबंधित कुलगुरूंनी याची दखल घ्यावी अन्यथा असे जर काही घडले तर संपूर्ण राज्यभर शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान च्या वतीने तीव्र आणि उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी पांडूराजे राजे भोसले यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *