जामखेड प्रतिनिधी,

जामखेड नगर रोडवरील आग विझवण्याच्या फायरबॉल बनवणाऱ्या गोडाऊनला आग गोडाऊन मध्ये कामगार काम करत असताना लाईटच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाले आहेत.या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे

यामध्ये ज्ञानेश्वर चंद्रकात भोडवे रा. घोडेगाव.ता.जामखेड व जहीर सत्तार मूलानी, रा तेरखेडा. ता कळंब अशा दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी नगररोड वरील सावळेश्वर ट्रक्टर च्या मागे गोडाऊन मालक पंकज शेळके यांचा रेडमॅटीक ऑटोमॅटीक फायर फायटर चे उत्पादन करण्याचे दोन वर्षापासून गोडाऊन आहे. या आग विझवण्याच्या फायरबॉल गोडाऊन मध्ये आज दुपारी कामगार ज्ञानेश्वर चंद्रकात भोंडवे व जहीर सत्तार मुलानी हे दोन कामगार काम करत होते तर इतर दोघे गोडाऊन च्या बाजुला थांबलेले असताना अचानक या गोडाऊनला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यानंतर जेसीबी च्या सहाय्याने या गोडाऊनला पाठीमागून भगदाड पाडण्यात आले. या नंतर या गोडाऊन मधुन धुराचे मोठे लोट बाहेर येत होते. तसेच आत मध्ये असलेल्या फायरबॉल चे आगीमुळे स्फोट होत होते. या स्फोटांच्या अवाजाने आजुबाजूचे लोक धावत बाहेर आले मात्र धुराचा लोट खूप मोठा होता यामुळे कोणालाही गोडाऊन मध्ये आत जाता आले नाही .

 

या घटनेनंतर जामखेड नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या गाडीला तातडीने बोलावण्यात आले .अग्निशामक दल व आजुबाजुला जमलेल्या नागरीकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले अखेर आग आटोक्यात आणली. यानंतर गोडाऊनमध्ये जाऊन पाहीले असता या आगीत ज्ञानेश्वर चंद्रकात भोंडवे व जहीर सत्तार मुलानी या दोन जणांचा जागेवरच होरपळून मुत्यू झाला होता .तर बाजुला असलेले पुजा पठाडे आणि गणेश पवार रा.जामखेड हे दोन जण जखमी झाले.

या घटनेची घटनेची माहिती सुनील कोठारी व संदेश कोठारी यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना दिली. यानंतर संजय कोठारी यांनी तातडीने जखमींना आणण्यासाठी आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहचले व त्याच बरोबर अग्नीशामक दलाचे कर्मचारी विजय पवार,अय्याज,अहमद सय्यद , व पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल भारती व सुनील बडे व त्यांचे सहकारी ,दिपक भोरे, , बापु गायकवाड, विशाल ढवळे, सुनील मोरे,तनवीर मुलानी, निखिल कुमकर, गोकुळ जाधव, सनी सदाफुले सह अनेक नागरिक आग आटोक्यात आणण्यासाठी मदत करत होते.


यावेळी जखमींना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी व त्यांच्या सहकार्‍यांनी मदत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *