जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील चोबेवाडी येथिल एका महिलेने आपल्या नातेवाईकांशी संगनमत करून लातूर जिल्ह्य़ातील अहमदपूर तालुक्यातील ट्रक ड्रायव्हरला फेसबुकवर फ्रेंन्ड करून रिक्वेस्ट पाठवली. व आपला फोन नंबर देवून प्रेमाच्या गप्पा मारण्यास सुरवात केली. व आपल्या घरी बोलावून सदर ड्रायव्हरला लाठी-काठीने मारहाण करुन पैशाची मागणी केली. तसेच त्या महिलेसोबत अर्धनग्न अवस्थेत व जबरदस्तीने फोटो काढले. व पैसे दिले नाही तर बलात्काराची खोटी तक्रार दाखल करील अशी धमकी दिली.
त्यामुळे ड्रायव्हरने घाबरुन आरोपींना काही पैसे दिले. मात्र त्यांची पैशाची भुक वाढल्याने ड्रायव्हर यांची पत्नी व इतर नातेवाईक यांना ड्रायव्हरचेच मोबाईल वरुन फोन करुन पैशाची मागणी करीत होते. दरम्यान सदर पिडित ड्रायव्हरच्या पत्नी हिने डायल ११२ नंबरवर कॉल केल्याने पोलीसांनी ड्रायव्हरच्या मोबाईल लोकेशन वरुन शोध घेतला व सविस्तर चौकशी करुन ड्रायव्हरचे तक्रारीवरुन सदर महिला व तिचे नातेवाईक यांचे विरुध्द अन्यायाने कैदेत ठेवणे, खंडणी व दुखापतीचा गुन्हा नोंद केला आहे. एक आरोपी अटक केला असुन इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.जामखेड तालुक्यात पहिल्यांदाच हनीट्रॅपचे प्रकरण घडल्याने चर्चांना एकच उधाण आले आहे. तर या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा छडा लावून हॅनीट्रॅप उघड केल्याबद्दल जामखेड पोलीसांचे जनतेतून मोठे कौतुक होत आहे.
याबाबत सविस्तर असे की यातील फिर्यादी व आरोपी यांची फेसबुकवर ओळखून यातील आरोपीत क्रमांक तीन हिने सामाजिक माध्यमाद्वारे फेसबुक फिर्यादी सोबत बोलून तिचा मोबाईल क्रमांक देऊन नान्नज तालुका जामखेड येथे बोलावून घेऊन चोबेवाडी गावचे शिवारात राहते घरी घेऊन गेली तेथे फिर्यादी यांना शिवीगाळ दमदाटी करत काठीने मरण केली त्यानंतर फिर्यादीचे पत्नीस फिर्यादीचे फोनवरून फोन करून दोन लाख रुपयांची मागणी करून तुम्ही आम्हाला दोन लाख रुपये द्या नाहीतर आम्ही फिर्यादी या जीवे ठार मारून टाकू तसेच आमच्याकडे काढलेले फिर्यादीची फोटो व्हायरल करू नाहीतर त्याचे विरुद्ध बलात्काराची खोटी केस करू असे म्हणाल्याने फिर्यादीने त्यांच्याकडील एक हजार रुपये रोख रक्कम दिली तसेच बाकी पैसे देतो असे म्हणून आरोपीत मजकूर यांनी फिर्यादीस त्यांचे घरामध्ये अनाधिकृत डांबून ठेवून त्याचे बळजबरीने कपडे काढून त्याचे अर्ध नग्न अवस्थेत फोटो काढले आहेत. यानुसार फिर्यादी शरद बालाजी पाटील (वय ३५) , धंदा ड्रायव्हर, रा. शिरूर ताजबंद, ता. अहमदपूर, जि. लातूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी १) नितीन चंदन काळे २) सचिन काळे ३) सारिका काळे ४) किरण काळे यांचे विरुद्ध गु.र.नं. व कलम :- 200/2023भादवि कलम 386, 388, 342, 324, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना दि. ११ मे रोजीचे ९:३० ते दि. १२ मे रोजीचे ४:०० वाजताचे दरम्यान जामखेड तालुक्यातील चोबेवाडी येथे घडली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शिवाजी बोस हे करत आहेत.
सदरची कारवाई हि श्री. महेश पाटील पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक श्री. सुनिल बडे, पोलीस उपनिरीक्षक अनिलराव भारती व जामखेड पोलीस स्टेशनच्या कर्मचारी यांचे पथकाने मा. प्रशांत खैरे, अप्पर पोलीस अधिक्षक अहमदनगर, मा. श्री. आण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग कर्जत यांचे मार्गदर्शनाखाली केली आहे.
चौकट..
अशा प्रकारचे हनीट्रॅप मध्ये कोणी अडकले असल्यास न घाबरता पोलीसांत तक्रार नोंद करावी. जामखेड पोलीसांच्या वतीने त्यांना योग्य ते सहकार्य केले जाईल असे आव्हान करण्यात येत आहे.
पोलीस निरीक्षक महेश पाटील
पोलीस स्टेशन जामखेड, जिल्हा अहमदनगर