गॅलक्सी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

*गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे अल्पावधीतच गॅलक्सी इंग्लिश स्कूलचा नावलौकिक वाढला – आमदार प्रा राम शिंदे*

*गॅलक्सी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न*

जामखेड प्रतिनिधी :-

चांगल्या दर्जाचे गुणात्मक शिक्षण गॅलक्सी इंग्लिश स्कूलमध्ये मिळत असल्याचा अनुभव प्रत्येक पालकाला येतोय.डाॅ अल्ताब शेख व त्यांची टीम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी मेहनत घेत आहे. त्यामुळे दरवर्षी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. शाळेचा नावलौकिक वाढत आहे. पुणे, अहमदनगर, मुंबईत ज्या पध्दतीने वार्षिक स्नेहसंमेलन होतं त्याच धर्तीवर गॅलक्सी इंग्लिश स्कूलमध्ये होत आहे, ही बाब कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन आमदार प्रा राम शिंदे यांनी व्यक्त केली.

जामखेड येथील ज्ञान ज्योती ग्रामीण विकास प्रतिष्ठाण या संस्थेच्या वतीने जामखेड तालुक्यातील हळगाव येथे गॅलक्सी इंग्लिश स्कूल चालवली जाते. गॅलक्सी इंग्लिश स्कूल ही जामखेड तालुक्यातील पहिली इंग्रजी माध्यमाची आयएसओ मानांकन प्राप्त शाळा आहे. या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ 23 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी आमदार प्रा राम शिंदे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार प्रा राम शिंदे बोलत होते.

जामखेड तालुक्यातील हळगाव येथे ज्ञानज्योती ग्रामीण विकास प्रतिष्ठाणने 2015 साली गॅलक्सी इंग्लिश स्कुलची स्थापना केली. या शाळेत सध्या 356 पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गॅलक्सी इंग्लिश स्कूलचे यंदा नववे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. महाराष्ट्र गीताने स्नेहसंमेलनास सुरुवात झाली तर देस रंगीला या देशभक्तीपर गीताने कार्यक्रमाची समाप्ती झाली.

यावेळी सादर करण्यात आलेल्या प्रत्येक गाण्याला उपस्थितांनी प्रचंड दाद दिली. विद्यार्थ्यांनी अप्रतिम कलाविष्कार दाखवत उपस्थितांची मने जिंकली. तब्बल चार तासापेक्षा अधिक वेळ हा कार्यक्रम रंगला. आपल्या पाल्यांचा कलाविष्कार पाहण्यासाठी पालकवर्ग मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होता. स्कूलच्या प्राचार्या प्रियंका भोरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष डाॅ अल्ताब शेख यांनी केले. आभार प्रा आव्हाड सर यांनी मानले.

यावेळी माजी सभापती डॉ .भगवान मुरूमकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शरद कार्ले, अमित चिंतामणी, प्रवीण चोरडिया, प्रवीण सानप, अमोल चिंतामणी , प्रकाश काका शिंदे, पांडुरंग उबाळे, लहू शिंदे, अमोल शिंदे, डाॅ ज्ञानेश्वर झेंडे,उद्धव हुलगुंडे, नानासाहेब गोपाळघरे, बाजीराव गोपाळघरे, अशोक देवकर, उदय पवार, उमेश रोडे, महादेव राऊत मेजर, ल.ना.होशिंग विद्यालयाचे प्राचार्य होशिंग सर

भैरवनाथ विद्यालयाचे प्राचार्य आरसूळ सर, डॉ.संजय भोरे, सुनील यादव,आबासाहेब ढवळे, राजुभैय्या सय्यद ,संस्थेचे उपाध्यक्ष तुकाराम राऊत, संस्थेचे संचालक बाळासाहेब ससाणे, इकबाल शेख,अविनाश नवगिरे, शकील शेख, आदी मान्यवर उपस्थित होते.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page