जि. प. प्राथ.शाळा मराठी मुले-मुली जामखेड येथे भरला बाल आनंदी बाजार

 

जामखेड प्रतिनिधी,

जि. प. प्राथ.शाळा मराठी मुले-मुली जामखेड येथे बाल आनंदी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी
कार्यक्रमाचे उद्घाटन जामखेड तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी मा.बाळासाहेबजी धनवे यांचे हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली.

उद्घाटन प्रसंगी बोलताना मा.गटशिक्षणाधिकारी धनवे साहेब म्हणाले की , विद्यार्थ्याना जीवनाभिमुख शिक्षण मिळावे. वर्गात मिळालेल्या शिक्षणाचे उपयोजन दैनंदिन जीवनात विद्यार्थ्याला करता यावे ,यासाठी *आनंदी बाजार* हा उपक्रम खूप महत्वाचा आहे.

अशा स्तुत्य उपक्रमाचे पद्धतशीर व नियोजनपूर्वक आयोजन केल्याबद्दल मराठी मुले-मुली जामखेड शाळेचे भरभरून कौतुक करत समाधान व्यक्त केले.

आनंदी बाजारात विविध फळे, फळभाज्या, खेळण्यांची, मिठाईची , खाद्यपदार्थाची दुकाने मांडून बाल विक्रते आपला माल विकावा म्हणून ग्राहकांना मालाचे महत्व पटवून देत होते. तसेच पैसे नाणी व नोटा यांचा हिशोब पटापट जुळवून देत होते.प्रत्येक विध्यार्थी आनंदाने आपला माल विकत होता.

मा.गटशिक्षणाधिकारी बाळासाहेबजी धनवे यांनी प्रत्येक दुकानांना भेट देवून बाजार खरेदी केला तसेच विद्यार्थ्यांचे कौतुक करत शाबासकी दिली.त्यांच्यासमवेत दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय कर्डीले सर,दत्तात्रय यादव सर, व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री संतोष गिरी,श्री नासिर सय्यद, श्री संतोष तवटे , भाऊसाहेब काळे , निलेश गायकवाड तसेच सर्व सदस्य उपस्थित होते.

*आनंदी बाजारा सोबत आनंद नगरी भरविण्यात आली होती आनंद नगरीत मिकी माउस, झाम्पिंग झप्पा* याचा आनंद घेताना बाल विद्यार्थ्यांचा आनंद शिगेला पोहोचला होता आनंद नगरीचा सर्व पालक, शिक्षक, माता पालक व उपस्थित सर्व ग्राहकांनी मनसोक्त आनंद घेतला. आजचा दिवस सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा ठरला.

*आनंदी बाजार* यशस्वी व्हावा म्हणून मराठी मुले शाळेचे श्री कदम सर , माकुडे सर , नितीन मोहोळकर सर, म्हेत्रे मॅडम धाउड मॅडम ,पोले मॅडम, वराडे मॅडम ससाने मॅडम, साबळे मॅडम,साळे मॅडम. तसेच मराठी मुली शाळेचे श्रीम बडे मॅडम, निशा कदम मॅडम ,सिद्धेश्वर मॅडम, कानडे मॅडम ,पवार मॅडम भोसले, मॅडम झोरे मॅडम, खेडकर मॅडम ,जाधव मॅडम व जोगदंड सर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *