शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांचे मोलाचे योगदान :- श्री. प्रा. सचिन घायवळ…
जामखेड प्रतिनिधी :-
जामखेड तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी तालुक्यातील सर्व शिक्षक मेहनतीने काम करत असून त्यांना मोलाची साथ व पेरणा गट विकास अधिकारी श्री प्रकाश पोळ व गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे हे दोघे देत आहेत..
त्यामुळे जामखेड तालुका नक्कीच गुणवत्तेत प्रथम क्रमांकावर येईल असा विश्वास बास्केटबॉल संघटनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष व पुणे जिल्हा अध्यक्ष व जामखेड चे भूषण प्रा. श्री. सचिन घायवळ यांनी व्यक्त केला.
त्यावेळी समस्त भीमसैनिकांचा बुलंद आवाज सामाजिक कार्यकर्ते मा. विकीभाऊ सदाफुले, गट विकास अधिकारी श्री प्रकाश पोळ, गटशिक्षणाधिकारी श्री बाळासाहेब धनवे आदी मान्यवर उपस्थित होते.
जामखेड गटशिक्षणाधिकारी कार्यालयात त्यांनी आज सदिच्छा भेट दिली. जामखेड गट शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने त्यांचा झाडाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. त्यांनी शिक्षण विभागाला चांगले मार्गदर्शन केले, तसेंच भविष्यात पाहिजे ते सहकार्य केले जाईल अशी ग्वाही दिली.
त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते मा. विकीभाऊ सदाफुले यांनी ही जामखेड तालुक्यातील शिक्षण विभागाचे काम चांगले असून वेगाने प्रगती होत असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले. गोर गरिब विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळत असल्याचे सांगितले त्यावेळी इतर मान्यवर उपस्थित होते.