जयश्री आई फडके यांचा आदर्श समाजातील महिलांनी घ्यावा-जामखेड बाल-कल्याण विभाग प्रकल्प अधिकारी ज्योतीताई बेल्हेकर

जामखेड (प्रतिनिधी)

ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृहाच्या आधारस्तंभ पुणे येथील जयश्री (आई) फडके यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड तालुक्यातील 100 महिलांना साडी वाटप करण्यात आले.

निवारा बालगृह (समता भूमी) मोहा फाटा जामखेड येथे संस्थेच्या सचिवा मा. उमाताई जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन जामखेड बालकल्याण विभाग प्रकल्प अधिकारी श्रीमती ज्योतीताई बेल्हेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. डॉ. अरुण जाधव, संचालक बापूसाहेब ओहोळ, उषाताई बांगर, द्वारका ताई पवार, रेश्मा ताई बागवान, सुरेखा चव्हाण विशाल पवार आदी यावेळी उपस्थित होते.
जयश्री आई फडके यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील निराधार, वंचित, अत्याचार ग्रस्त, बेघर, बेसहारा, ज्यांना कोणाचा आधार नसलेल्या महिलांनी जळून घ्यायचं नाही, फाशी घ्यायची नाही, औषध प्यायचं नाही, कोणीही मरायचं नाही, त्यांनी ग्रामीण विकास केंद्र जामखेड या ठिकाणी आईचं घरं नावाचा प्रकल्प उभा राहिलेला आहे त्याठिकाणी येऊन राहायचं आहे.

या कार्यक्रमाच्या वेळी बोलताना बालकल्याण विभाग प्रकल्प अधिकारी ज्योतीताई बेल्हेकर बोलताना म्हणाले की जयश्री आई फडके यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड तालुक्यातील विधवा गरजू, गरीब महिलांना साडी वाटपाच्या कार्यक्रमास मला बोलावले हे मी माझे भाग्य समजते. कारण मी गेले अनेक वर्षापासून ग्रामीण विकास केंद्र या संस्थेचे काम जवळून पाहत आहे.

की जयश्री आईंची मुलगी जयंती ताई फडके यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड तालुक्यात चालू असलेला माय-लेकरू हा प्रकल्प अगदी तळागाळातील महिलांवरती काम करत आहे. त्या महिलांना त्यांचे नागरिकत्वाचे पुरावे काढून देत आहे तसेच वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी माय- लेकरू प्रकल्पातील सर्व कर्मचारी अगदी जीवाचे रान करून काम करतात. याठिकाणी आलेल्या महिलांच्या व्यथा गाथा ऐकून ग्रामीण विकास केंद्र संस्थेला मदत म्हणून आम्ही त्यांना महिला बालकल्याण विभागाअंतर्गत संस्थेला महिला समुपदेशक केंद्र चालू करण्यासाठी लागेल ती मदत करण्यास आम्ही तयार आहेत,असे त्यांनी आश्वासन दिले,

ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी प्रथमता कार्यक्रमास उपस्थित सर्वांच्या वतीने जयश्री आई फडके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आमच्या आई या विधवा, परित्यक्ता, बेघर, बेसांहारा, महिलांच्या आधार आहे असे सांगितले. समाजात ज्या लोकांना या न्यायव्यवस्थेने नाकारले आहे त्यांच्यासाठी ग्रामीण विकास केंद्र व माय-लेकरु हा प्रकल्प काम करत आहे. कोणत्याही महिलेला ज्यावेळेस अडचण येईल त्यावेळेस आम्हा सर्व सहकाऱ्यांना रात्री-बेरात्री मदतीसाठी हाक द्यायचा आम्ही तुमचे भाऊ आहोत, आत्ता तुम्ही रडायचं नाही!! लढायचं आहे, आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमचा हक्क तुम्हाला मिळाला पाहिजे असे त्यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले, सचिन भिंगारदिवे यांनी प्रास्ताविक केले संतोष चव्हाण सर यांनी सूत्रसंचालन केले व उमाताई जाधव यांनी आभार मानले,

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मायलेकरू प्रकल्पाचे प्रशिक्षित प्रकल्प समन्वयक सचिन भिंगारदिवे, विशाल पवार, गणपत कराळे, रेशमाताई बागवान, राजू शिंदे, शहाणूर काळे, आलेश शिंदे, ऋषिकेश गायकवाड, गौतमी गंगावणे, छाया मोरे, पायल मुळेकर, प्रियंका ताई घोडेश्वर, आदी मान्यवर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *