जामखेड प्रतिनिधी
*जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन आणि कोठारी प्रतिष्ठान जामखेड*आयोजित अवयदान संकल्प अभियानात…,…
माय लेकीने भरला जन्मदिनानिमित्त अव्ययदांचा फार्म
यांनी केला मरणोत्तर आवयव दानाचा संकल्प शुक्रवार दिनांक २२/८/२०२४ रोजी तालुका जामखेड श्रीमती मीना कांतीलाल राळेभात आणि मुलगी श्रावणी मारुती पठाडे वय १९ आज शहरातील कोठारी प्रतिष्ठानच्या ऑफिसमध्ये येऊन स्वतःचा मरणोत्तर संकल्प आवयव दान अभियान अंतर्गत फॉर्म भरलेला आहे
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी मनाले गेल्या बऱ्याच वर्षापासून सामाजिक कार्यकर्ता असून आम्ही गेल्या काही वर्षापासून देहदान डोळे दान जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि कोठारी प्रतिष्ठान मार्फत ४८८ फॉर्म भरले असून १८ जणांनी देहदान डोळे दान केले आहे आज ४९० लोकांचे फॉर्म भरून झाले आहेत.
श्रीमती मीना कांतीलाल राळेभात म्हणाल्या आज माझी मुलगी श्रावणी तिचा एकोणिसावा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आज फॉर्म भरलेला आहे आम्हाला संपूर्ण माहिती माननीय सोमनाथ पोकळे यांनी दिली असून त्यांनी पण काही दिवसापूर्वी फॉर्म भरलेला आहे तसेच उमेशकाका देशमुख यांच्याकडून प्रेरणा घेऊन
मी आज सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्याकडे येऊन आपला आवयव दान चा फॉर्म भरलेला आहे
यावेळी बोलताना शिवानी मारुती पठाडे म्हणाली मी शाळा शिकत आहे माझे वय १९ आहे बऱ्याच दिवसापासून देहदान संकल्प अभियानात फार्म भरायची इच्छा होती जामखेड येथील बऱ्याच लोकांनी मला येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्याकडे देहदान फॉर्म भरले जातात अशी माहिती दिली आणि त्यांचे सामाजिक कार्य खूप उल्लेखनीय आहे अपघातातील लोकांना वाचवायचे काम त्यांनी बऱ्याच वर्षापासून चालू ठेवले आहे. तसेच त्यांनी कोरोना काळात लोकांना खूप मदत केली आहे म्हणाल्या.
माझ्या देहापासून पासून अनेक डॉक्टर बनतील आणि अनेकांचे प्राण वाचवतील माणूस मेल्यानंतर त्याची राख होण्यापेक्षा आपला देह कोणाचे तरी कामाला यावा या उद्देशानेआम्ही आज जैन कॉन्फरन्स आणि कोठारी प्रतिष्ठान यांच्या ऑफिसला येऊन स्वखुशीने फॉर्म भरत आहे.
तसेच यावेळी बोलताना मीना राळेभात म्हणाल्या मी माझ्या स्वैच्छेने सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्याकडे स्वखुशीने आवयव दांनचा फॉर्म भरण्यास आले सगळी माहिती ऐकून मला खूप आनंद वाटला
माझा देह जाळून राख होण्यापेक्षा डॉक्टर होणारे मुले शिकतील आणि माझ्या देहापासून शिकून लोकांचे प्राण वाचवतील.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले आम्ही जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि कोठारी प्रतिष्ठान जामखेड अंतर्गत आत्तापर्यंत ४८८ जणांनी देहदान चे फॉर्म भरले असून १८ जणांनी डोळे दान, अवयव दान, देह दान केलेले आहेत या कामात डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन मेडिकल कॉलेज अहमदनगर यांचे आणि डॉक्टर सुधीर पवार यांचे सहकार्य लाभले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, भारतीय जैन संघटनेचे जिल्हा सचिव प्रफुल्ल सोळंकी, रोहन कोठारी आदीं उपस्थित होते