प्रा. मधुकर (आबा) राळेभात हे येणाऱ्या 25 ऑगस्ट रोजी रविवार दुपारी तीन वाजता आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार…..
राजकिय वर्तुळात उडणार खळबळ !
जामखेड प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर (आबा) राळेभात हे येणाऱ्या 25 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला धक्का बसणार का? व इतर पक्षाकडून विधानसभेच्या निवडणुकीत उतरणार का? याकडे सर्वच नागरिकांचे लक्ष लागले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा मधुकर (आबा) राळेभात हे गेल्या 35 वर्षापासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी 1990 साली शिवसेनेत प्रवेश करुन 1995 साली जामखेड तालुका शिवसेना प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी 15 वर्षे शिवसेना तालुकाप्रमुख तर 5 वर्षे शिवसेना जिल्हा उपप्रमुख म्हणून काम पाहिले आहे.
1997 साली त्यांनी जिल्हा परिषद निवडणुक लढवली होती मात्र त्यांना या निवडणुकीत हार मानावी लागली होती. यानंतर तब्बल 10 वर्षे लोकांची सेवा केल्यानंतर 2007 साली ते जिल्हा परिषद निवडणुक लढवून विजयी झाले होते. 2009 साली देखील प्रा मधुकर राळेभात यांनी विधानसभा निवडणुक लढवली होती त्यावेळी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी त्यांनी विधानसभा निवडणुकीत तिसर्या क्रमांकाची मते मिळवली होती. गेली पंचवीस वर्षे ते शिवसेनेत होते.गेल्या आठ वर्षांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करत आहेत तर मध्यंतरी राष्ट्रवादी पक्षात फुट पडल्या नंतर गेल्या तीन वर्षांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून काम पहात आहेत.
मात्र तब्बल आठ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये राहील्या नंतर पुन्हा एकदा ते 25 ऑगस्ट 2024 रोजी रविवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन ते आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत.सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर (आबा) राळेभात हे आमदार रोहित (दादा) पवार यांचे खंदे समर्थक आहेत. मागिल विधानसभा निवडणुकी दरम्यान आ. रोहित (दादा) पवार यांना आमदार करण्यात त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. मात्र आता ते राजकीय निर्णय वेगळा घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्राध्यापक मधुकर (आबा) राळेभात हे वैयक्तिकरित्या विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत यावरून नेमके त्यांच्या मनात काय आहे.
हे मात्र उद्याप त्यांना मानणार्या कार्यकर्त्यांना व नागरिकांना समजून येत नव्हते.आता उद्याच्या रविवार दिनांक 25 रोजी दुपारी ते आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत व याबाबत ते पत्रकार परिषद घेऊन नेमकी राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून जर प्रा. मधुकर राळेभात यांनी आपला वैयक्तिक राजकीय निर्णय जर वेगळा घेतला तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित (दादा) पवार यांना मोठा धक्का बसणार जाणार आहे. मात्र राजकीय भूमिका ते काय घेणार व येणाऱ्या विधानसभा निवडणूक मध्ये इतर पक्षात जाऊन विधानसभा निवडणूक लढवणार का? हे अद्याप निश्चित झालेले नाही. त्यामुळे येणाऱ्या 25 ऑगस्ट रोजी आता प्रा. मधुकर (आबा) राळेभात हे काय भूमिका घेणार याकडे मात्र कर्जत जामखेडच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व नागरिकांचे लक्ष लागले आहे.