जामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.

बाजार समितीच्या माध्यमातून आ. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांसाठी भरीव कामगिरी : सभापती पै .शरद कार्ले.

जामखेड प्रतिनिधी,

जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जेजे शक्य असेल त्या सुविधा पुरवण्यात येत असून बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या आडत व्यापारी ,हमाल व मापाडी यांच्यासाठीही सर्वोतोपरी प्रयत्न केल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला असून आगामी काळातही अनेक उपाययोजना करण्यासाठी पुर्ण आराखडा तयार केला असल्याची माहिती छ. शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेडचे सभापती पै .शरद कार्ले यांनी दिली आहे.
आ.राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एक वर्षांपूर्वी जामखेड बाजार समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने सभापती शरद कार्ले यांनी जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी व बाजार समितीतील व्यापाऱ्यासाठी केलेल्या कामाचा आढावा घेतला.
कोण कोणत्या सुविधा दिल्या व आगामी काळात आपले कोणते व्हिजन असेल अश्या प्रकारे आराखडा मांडणारे शरद कार्ले हे बाजार समितीच्या ईतिहासात एकमेव सभापती असावेत.
बाजार समितीचा विस्तार करण्यासाठी घेलेलेल्या १५ एकर जमीनकडे जाणारा तसेच गेली पंधरा वर्षे पासून प्रलंबित असलेला रस्ता खुला केला केला असून या ठिकाणी अधुनिक पध्दतीने बाजार समितीचा विस्तार करण्याचे काम हाती घेतले आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी कांद्याच्या कमी भावामुळे शिंदे सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदान जाहीर केले होते. त्यानुसार जामखेड तालुक्यातील मोठ्या प्रमाणात असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ते मिळालेही .मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे बरेच शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत. त्यासाठी राज्याचे पणन मंत्री मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे प्रलंबित कांदा अनुदानसाठी पाठपुरावा सुरू आहे .
खर्डा परिसरातील शेतकऱ्यांसाठी जामखेड बाजार समीतीच्या वतीने खर्डा येथील उप बाजार समितीच्या
आवारात वखार महामंडळा अंतर्गत उभारण्यात आलेल्या भव्य अशा गोडाऊनच्या माध्यमातून धान्य तारण योजना सुरू करण्यात आली असून याव्दारे शेकडो शेतकरी याचा लाभ घेत आहेत .
जामखेड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून तसेच कांदा व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा दुबई देशांमध्ये निर्यात करण्यात आला असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम केले. तसेच बदलत्या काळानुसार वाढणाऱ्या महागाईचा विचार करून बाजार समितीतील हमाल व मापारी यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी त्यांच्या दर पत्रकाविषयी शेतकरी, व्यापारी व हमाल व मापारी यांच्या बैठकांव्दारे योग्य मोबदला मिळवून देण्याचे काम केले.
जामखेड बाजार समितीत गेली अनेक दशकांपासून परिसरातील जिल्ह्यात सर्वात मोठा जनावरांचा बाजार भरतो. शेतकऱ्यांच्या शेतमालाबारोबरच त्याचेंशी निगडित असलेल्या जनावरांच्या बाजारामुळे येथे अनेक तालुक्यातून येणारे शेतकरी व व्यापारी आपली जनावरे घेऊन येतात. त्यामुळे त्यांना सुविधा देण्यासाठी बाजार समितीच्या आवारात जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी कुपनलीका (बोअर) घेऊन पाण्याची सुविधा निर्माण करून दिली .तर शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची थंड अशा जारची सोय करून देण्यात आली आहे. याबरोबरच जामखेड बाजार समितीच्या खर्डा उपबाजार समीतीत शेळी ,मेंढीचा नवीन बाजार सुरू केला आहे. एकंदर शेतकऱ्यांच्या जिवनाशी निगडित असलेल्या जामखेड बाजार समितीच्या माध्यमातून सभापती म्हणून आमचे नेते माजीमंत्री आ. प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून व मार्गदर्शनाखाली संचालक, व्यापारी व शेतकरी यांना आवश्यक त्या सर्व सुविधा व शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी कटीबध्द राहण्याची ग्वाही मी या माध्यमातून देतो.
याबरोबर आगामी काळात जामखेड बाजार समितीतील अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ‘संत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’, व्यापाऱ्यांसाठी ‘व्यापारी भवन’ उभारणे, शेतकरी, हमाल व मापारी यांच्यासाठी ‘अल्प दरामध्ये भोजनाची व्यवस्था’, तसेच जामखेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकी जवळ असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १५ एकर जमीनीवर शेतकऱ्यांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधांनी युक्त अशी भव्य अशी स्वतंत्र कांदा मार्केट व तसेच भुसार मालाच्या व्यापाऱ्यांसाठी सुध्दा सुसज्ज मार्केट उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.तसेच नान्नज येथे उप बाजार समितीची लवकरच स्थापन होणार आहे.यासाठी आ. प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून राज्याचे पणन मंत्री मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *