शंभूराजे कुस्ती संकुलच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी

*शंभूराजे कुस्ती संकुलच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी*

जामखेड प्रतिनिधी,

छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती शंभूराजे कुस्ती संकुलच्या वतीने खर्डा चौक जामखेड येथे ह भ प कैलास महाराज भोरे व मा.मंगेश दादा आजबे यांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार घालून व पूजा करून जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी बोलताना ह भ प भोरे महाराज म्हणाले की,शंभूराजे कुस्ती संकुलच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कुस्त्यांनाचा थरारक आखाडा, मा जिजाऊ माँ साहेब यांची जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर आशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.हे चांगले काम मंगेश दादा आजबे यांच्या माध्यमातून चालले आहे. त्यामुळे मी त्यांचे कौतुक करतो.

यावेळी मंगेश दादा आजबे बोलताना म्हणाले की, महापुरुषांच्या जयंती साजरी करण्यामागचा उद्देश म्हणजे समाजाला या महापुरुषांचा इतिहास कळला पाहिजे यांचे विचार तरुण पिढीने आत्मसात करावेत हाच या मागचा उद्देश आहे.त्यामुळे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माँ साहेब, छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करतो.

यावेळी जामखेड तालुक्यातील नागरिक शिवप्रेमी व शंभूराजे कुस्ती संकुलच्या पैलवान मोठ्या उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांनी वडिलांच्या निधनानंतर मराठा साम्राज्य सांभाळले. छत्रपती संभाजी राजेंनी १६८१ ते १६८९ अशी ९ वर्षे त्यांनी दुसरे छत्रपती म्हणून राज्य केले. १४ मे ही त्यांची जयंती म्हणून साजरी केली जाते. महाराष्ट्रात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

संभाजी राजेंच्या जयंती दिवशी विविध कर्यक्रमांचे आयोजन केले जाते. छत्रपतींच्या शौर्याचे पोवाडे गायले जातात. गड-किल्ल्यांवर उत्सवांचे आयोजन होते. इतिहासाच्या पानापानांतून महाराजांच्या शौर्याचे धडे घेतले जातात.

संभाजीराजे यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांच्या पोटी किल्ले पुरंदर येथे झाला. मात्र, पुढील अवघ्या दोन वर्षांमध्ये सईबाई यांचे निधन झाले. यानंतर संभाजी राजेंनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य, चिकित्सपणा आणि राज्यकारभाराचे सर्व गुण त्यांनी आत्मसात केले.
ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजी महाराज अतिशय देखणे आणि शूर होते. ते अनेक भाषांत विशारद व धुरंदर राजकारणी होते.
राजकारणातील बारकावे त्यांनी आत्मसात केले होते. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील लहानसहान बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते.

वयाच्या नवव्या वर्षी संभाजी महाराजांना अंबरचा राजा जयसिंग यांच्याकडे राजकीय बंधक म्हणून राहण्यासाठी पाठवण्यात आले होते.संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत, मराठा राज्य आणि मुघल साम्राज्यामध्ये अनेक लढाया झाल्या.

मराठा राज्याला आकार देण्यासाठी ते आवश्यक होते आणि त्यांच्या शौर्य आणि बुद्धिमत्तेसाठी ते आदरणीय आहेत.संभाजी महाराज मराठी व्यतिरिक्त ते इतर भाषाही बोलत होते.


संभाजीराजांनी राजकीय धोरण, आर्थिक धोरण, प्रजाहितदक्षता या सर्व बाबींमध्ये आपल्या अद्वितीय अशा वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवलेला दिसतो. याप्राणेच त्यांच्या धार्मिक धोरणावरही छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा उमटलेला आढळतो.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page