*”कालिका पोदार लर्न स्कूलच्या पहिल्याच बॅचचा निकाल 100℅”*

जामखेड प्रतिनिधी,

जामखेड ची शैक्षणिक उणीव कालिका पोदार स्कुलच्या माध्यमातून भरली आहे. कालिका पोदार स्कुलची सुरवात 2019 साली झाली. सुरवातीला 1 ली ते 6 वी पर्यंत वर्ग सुरु करण्यात आले होते.


नंतर या शाळेने भरारी घेत आज इयत्ता दहावी पर्यंत मजल मारत पहिल्याच दहावीच्या बॅचचा 100% निकाल लागला असून जामखेड तालुक्यातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
प्रदीर्घ प्रतिक्षेअंती अखेर तो दिवस उजाडला. तो दिवस जो कालिका पोदार स्कुलच्या शिक्षकांनी केलेल्या परिश्रमाचे फलित ठरणार होता. ज्या गोष्टीचा ध्यास या टिमने घेतला होता त्याचे परिमार्जन पाहण्याचा तो दिवस आला आणि शिक्षकांची मेहनत आणि विद्यार्थ्यांचे परिश्रम यामुळे 100% निकाल…..

CBSE बोर्डाच्या निकालाचा आणि CBSE बोर्ड परीक्षेचा निकाल यावेळी जाहीर झाला व
कालिका पोदार लर्न स्कूलच्या पहिल्या बॅचचा निकाल 100% लागला, त्यामध्ये शाळेतून प्रथम क्रमांक कु.सबुरी संदीप भंडारी, तिला 96.40% गुण मिळाले. द्वितीय क्रमांक चि.शिवम श्रीराम अंदुरे, त्याला 94.20% गुण मिळाले. तर तृतीय क्रमांक संपादन केला तो कु.प्रियल अमित बोथरा, तिला 91.00% गुण मिळाले.

यानंतर अनुक्रमे कु.वृशाली महादेव जाधवर 89.20℅ गुण चि.ओम विशाल गर्जे 88.20% गुण चि.रय्यान अब्दुलअजीज मकरानी 87.80% गुण चि.सक्षम दत्तात्रय अष्टेकर 84.20% गुण चि.आदेश बबन ढेकळे 83.00% गुण तर कु.अश्विनी अमोल तातेड 81.80% गुण मिळाले. यशस्वी सर्वच विद्यार्थ्यांचे शाळेचे पदाधिकारी मा.श्री उमाकांत अंदुरे, श्री नितीन तवटे ,मा.श्री प्रशांत कानडे, मा.श्री सागर अंदुरे, मा.श्री निलेश तवटे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच मा. प्रिंसिपल श्री प्रशांत जोशी यांनीही सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

हे घवघवीत यश हे कालिका पोदार लर्न स्कूल जामखेड च्या शिक्षकांचेच यश होय. कारण हे संपादन करत असताना त्यांनी केलेल्या कष्टाचे ख-या अर्थाने चीज झाले. शिक्षकांनी या कार्यात स्वत:ला झोकून दिले. त्यांंनी विद्यार्थ्यांसाठी अधिकच्या तासिका चालू केल्या. शिवाय ज्यांना गरज वाटते अशा विद्यार्थ्यांसाठी स्वतः प्रिंसिपल सरांनी स्वतःच्या राहत्या घरी क्लासेस घेतले आणि विद्यार्थ्यांना अधिकाधिक मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी वेळोवेळी विविध चाचण्यांच्या श्रृंखला घेण्यात आल्या. त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्याख्याने व मार्गदर्शन आयोजित करण्यात आली.

या यशामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यावर जामखेड तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *