गरीब रुग्णांसाठी साई समर्थ हॉस्पिटल ठरणार आधारवड – आ. सुरेश (आण्णा) धस.

गरीब रुग्णांसाठी साई समर्थ हॉस्पिटल ठरणार आधारवड – आ. सुरेश (आण्णा) धस..

जामखेडमध्ये ‘साई समर्थ हाडांचा दवाखाना व एम.आर.आय. सेंटर’चा उत्साहात शुभारंभ..

अत्याधुनिक सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर आणि परवडणाऱ्या उपचारांची नागरिकांना मिळणार सोय..

जामखेड | प्रतिनिधी
डॉक्टर हे जात-पात, धर्म किंवा आर्थिक परिस्थिती न पाहता प्रत्येक रुग्णाची निःस्वार्थ भावनेने सेवा करतात. जामखेड शहरातील विविध रुग्णालयांनी आपल्या दर्जेदार सेवेमुळे नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. त्याच परंपरेला पुढे नेत नव्याने सुरू झालेल्या **’साई समर्थ हाडांचा दवाखाना व एम.आर.आय. सेंटर’**च्या माध्यमातून गरीब व गरजू रुग्णांना परवडणारी, दर्जेदार आणि विश्वासार्ह आरोग्यसेवा मिळेल, असा विश्वास आमदार सुरेश (आण्णा) धस यांनी व्यक्त केला.

जामखेड शहरातील अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज **’साई समर्थ हाडांचा दवाखाना व एम.आर.आय. सेंटर’**चा शुभारंभ रविवारी (दि. २ ऑगस्ट) आमदार सुरेश (आण्णा) धस यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

कार्यक्रमास लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रांजलताई अमित चिंतामणी, सामाजिक कार्यकर्ते संजय (काका) कोठारी, ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर (आबा) राळेभात, सभापती शरद कार्ले, माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, आर.पी.आय. जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, पै. बबन (काका) काशिद, नगरसेवक प्रविण सानप, अमित चिंतामणी,श्रीराम डोके, आशोक शेळके,सुनील कोठारी, राहुल उगले, गणेश डोंगरे, विकास (तात्या) राळेभात,उल्हास माने,संजय नवले,किरण शिंदे,अभिजित राळेभात,काका गर्जे,डॉ सादेख पठाण,तात्यासाहेब जरे,करण ढवळे,प्रवीण होळकर.
हाडरोगतज्ज्ञ डॉ. अजय शिरसागर, एम.डी. मेडिसिन तज्ज्ञ डॉ. वैभव हुंबे तसेच हॉस्पिटलचे संचालक डॉ. भरत दारकुंडे व डॉ. सोनाली दारकुंडे यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार धस म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात गरीब रुग्णांच्या उपचारासाठी विविध शासकीय आरोग्य योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. साई समर्थ हॉस्पिटलने या योजनांचा लाभ अधिकाधिक गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवावा. अनेक महागड्या शस्त्रक्रियादेखील शासनाच्या योजनांमधून मोफत होऊ शकतात. त्यामुळे रुग्णांना योजनांची माहिती देणे आणि त्यांचा लाभ मिळवून देणे ही रुग्णालयाची सामाजिक जबाबदारी आहे. जामखेड नगरपरिषदेत स्वतंत्र वैद्यकीय कक्ष सुरू करण्याची गरज असून, त्याचा लाभ अनेक नागरिकांना होईल. मदतीसाठी माणुसकीची भावना आवश्यक असते आणि ती डॉ. भरत दारकुंडे यांच्या कार्यातून दिसून येते, असेही त्यांनी नमूद केले.

लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रांजलताई अमित चिंतामणी यांनी सांगितले की, वेळेत आणि गुणवत्तापूर्ण उपचार मिळणे ही आजची गरज आहे. साई समर्थ हॉस्पिटल सुरू झाल्यामुळे हाडांच्या आजारांवरील उपचारांसाठी नगर किंवा पुण्याकडे धाव घेण्याची गरज अनेक रुग्णांना भासणार नाही. डॉ. भरत दारकुंडे यांनी रुग्णसेवेला सामाजिक बांधिलकीची जोड देत गरजू नागरिकांसाठी महत्त्वाचे कार्य सुरू केले आहे, असे त्या म्हणाल्या.
ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर (आबा) राळेभात यांनी ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना कमी खर्चात दर्जेदार उपचार उपलब्ध व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आणि अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांमुळे हे रुग्णालय जामखेड व परिसरातील नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
रुग्णांना आधुनिक, विश्वासार्ह आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या रुग्णालयामुळे जामखेडसह परिसरातील हजारो रुग्णांना मोठा लाभ होणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अजय शिरसागर यांनी केले. सूत्रसंचालन निलेश दिवटे यांनी केले, तर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी साई समर्थ हॉस्पिटलच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles