Home जामखेड वार्ता सीमा पवार यांची जागतिक योगासन स्पर्धेत रौप्यपदकाची चमक

सीमा पवार यांची जागतिक योगासन स्पर्धेत रौप्यपदकाची चमक

0
3

सीमा पवार यांची जागतिक योगासन स्पर्धेत रौप्यपदकाची चमक

अहिल्यानगर-

जामखेड तालुक्यातील बावी येथील सीमा सुधीर पवार यांनी अहमदाबाद, गुजरात येथे ४ ते ८ जून २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या जागतिक योगासन क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेत (World Yogasana Sports Championship 2026) रौप्यपदक पटकावून भारतासह जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. या स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली.
सीमा पवार या सध्या पुणे येथील एका बहुराष्ट्रीय (Multinational) कंपनीमध्ये वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता (Senior Software Engineer) म्हणून कार्यरत आहेत. नोकरीची जबाबदारी सांभाळत त्यांनी योगासन क्षेत्रातही सातत्यपूर्ण मेहनत आणि समर्पणाच्या बळावर मोठे यश मिळविले आहे.
सीमा पवार यांनी यापूर्वी जिल्हास्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक, राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक तसेच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत रौप्यपदक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
जागतिक स्पर्धेसाठी पात्रता मिळविण्यासाठी १ व २ मे २०२६ रोजी सोनीपत, हरियाणा येथे निवड चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीत उत्कृष्ट कामगिरी करून त्यांनी जागतिक स्पर्धेत प्रवेश मिळविला.
अहमदाबाद येथे झालेल्या या ऐतिहासिक स्पर्धेत ७६ देशांतील खेळाडूंनी सहभाग नोंदविला. सीमा पवार यांनी वरिष्ठ अ महिला (Senior A Women) गटातील ‘ट्विस्टिंग बॉडी’ (Twisting Body) प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व केले. या प्रकारात १५ पेक्षा अधिक देशांतील स्पर्धक सहभागी झाले होते. कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर त्यांनी रौप्यपदक पटकावत देशासाठी मानाचा तुरा रोवला.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कुटुंबीय, प्रशिक्षक, ग्रामस्थ तसेच विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. सीमा पवार यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील युवा खेळाडूंना प्रेरणा मिळणार असून, शिक्षण, नोकरी आणि क्रीडा यांचा समतोल साधत मोठे यश मिळविता येते, हे त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे

Loading

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page