जामखेड प्रतिनिधी
आज दिनांक २/ ७/ २०२३ रोजी जामखेड पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचा वाढदिवस निवारा बालगृहातील अनाथ, निराधार, मुलांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,
ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह मोहा फाटा (समता भुमी) ता- जामखेड जि- अहमदनगर या ठिकाणी अनाथ, निराधार, वंचित, ऊसतोड मजूर, वीटभट्टी कामगार, लोककलावंत, भटके-विमुक्त, दलित, आदिवासी घटकातील 83 मुला-मुलींच्या शिक्षणासाठी गेले 8 वर्षापासून हा प्रकल्प चालवला जातो या बालगृहाला शासनाची कोणतीही मदत मिळत नसून हे बालगृह संपूर्णपणे शैक्षणिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील दानशूर व्यक्तींच्या मदतीतून व लोकवर्गणीतून चालवले जात आहे
या कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन स्वागत केले, व गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला, पाटील साहेबांनी त्यांचा वाढदिवस इतर ठिकाणी न साजरा करता तो खर्च टाळून निवारा बालगृहातील मुलांना एक वेळचे गोड जेवण देऊन या मुलांना एक आगळावेगळा आनंद देण्यात आला,
यावेळी बोलताना जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील म्हणाले की मला या ठिकाणी आल्यानंतर अगदी प्रसन्न असे वाटले व या मुलांकडे पाहिल्यानंतर मला माझ्या शाळेची आठवण झाली, अरुण आबा जे या गोरगरिबांसाठी काम करतात त्याचे मोल कशातच करता येणार नाही,ज्या मुलांना आई-बाबा माहित नाहीत त्या मुलांचे आई-बाबा होण्याचे काम आबा तुम्ही करतात तुमच्या कार्याला मी सलाम करतो या बालगृहात शिकणाऱ्या मुलांनी मोठे होऊन चांगले शिक्षण घेऊन अधिकारी बनलेले मला पाहायचे आहे
तरी या शहरातील लोकांनी या ठिकाणी येऊन आपला वाढदिवस साजरा करावा,व या बालगृहासाठी मदतीचा हात पुढे करावा, येणार्या पुढील काळामध्ये बालगृहातील मुलांना शिक्षणासाठी जी काही मदत लागेल ती मला सतत कळवावी, तसेच या बालगृहाच्या पुढील वाटचालीस त्यांनी भरभरुन अशा शुभेच्छा दिल्या
तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष- ॲड डॉ अरुण (आबा) जाधव यांनी ही महेश पाटील यांना या चिल्या-पिल्याच्या वतीने वाढदिवसाच्या भर भरून शुभेच्छा दिल्या ,
यावेळी संस्थेची संपूर्ण माहिती प्रकल्प समन्वयक संतोष चव्हाण सर यांनी दिली
यावेळी या वाढदिवसानिमित्त जामखेड पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल अविनाश ढेरे , ईश्वरसिंग परदेशी,आकाश चंदन,सागर टकले, सचिन भिंगारदीवे, नंदकुमार गाडे सर, विशाल पवार, तुकाराम पवार,गणपत कराळे, ऋषिकेश गायकवाड, व आभार वैजीनाथ केसकर सर यांनी मानले.