दहा महिन्यांपासून फरार खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अखेर जामखेड पोलिसांच्या जाळ्यात

जामखेड प्रतिनिधी,

जामखेड पोलीस स्टेशनला भादवी कलम ३०२,३४ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील १० महिन्यापासून फरार आरोपी स्वप्नील नामदेव थोरात वय (२९ वर्षे) रा. सावरगाव यास अटक करण्यात जामखेड पोलीसांना यश आले आहे.
या बाबत सविस्तर असे की, जामखेड शहरालगत असलेल्या धोत्री शिवारातील काँटन जिनींगमिलच्या गेटसमोर दि. २४/१० /२०२३ रोजी सकाळी ८ वाजेच्या पुर्वी कुणीतरी अज्ञात इसमाने गणेश शिवाजी वारे (वय ३०) या तरूणाचा निर्घृण खून केल्याची घटना  घडल्याने जामखेड परिसरात मोठी खळबळ उडाली होती.


सदर घटनेवरून मयत तरूण गणेश शिवाजी वारे चे वडील शिवाजी मारुती वारे (वय- ५२) रा. संगमजळगाव ता. गेवराई, जि. बीड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 485/2022 नुसार भा.द.वि. कलम ३०२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास जामखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे हे करत असताना आरोपीचा शोध घेणे कामी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती.

आरोपी हा त्याचे ओळख लपवून राहत होता. दि.०७/०८/२०२३ रोजी सदर आरोपी हा त्याचे सावरगाव ता. जामखेड येथे घरी आल्याची माहीती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे यांना मिळाल्याने तात्काळ त्यांनी स्टापला सोबत घेवुन आरोपीस सावरगांव येथुन ताब्यात घेवुन अटक केली. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असुन तपास चालु आहे.

सदर आरोपी हा खुनाच्या गुन्हयात मागील १० महिन्यापासुन फरार होता. त्यास अटक करणे आवश्यक होते. सदरची कामगीरी अहमदनगरचे पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी वखारे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे, पोलीस नाईक कोपनर, अविनाश ढेरे, भागवत, पोलीस काॅन्स्टेबल परेदेशी, विजय सुपेकर, नवनाथ शेकडे, सचिन देवढे,महीला पोलीस काॅन्स्टेबल धांडे या पथकाने केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *