चोरीला गेलेली स्प्लेंडर गाडी जामखेड पोलीसांनी दोन दिवसांत लावला छडा…
जामखेड पोलीसांनी बेनवडी ता.कर्जत येथुन अरोपी घेतला ताब्यात !
जामखेड प्रतिनिधी –
जामखेड बीड रोड येथील विजय कलेक्शन कापड दुकानात कपडे खरेदी करण्यासाठी गेले असता विजय कलेक्शन दुकानात जाण्यापुर्वी फिर्यादी प्रकाश श्रीरंग राळेभात वय 37 वर्षे रा.कोल्हेवस्ती, जामखेड, यांची मोटारसायकल विजय कलेक्शन कापड दुकानासमोर ऊभी केली होती.
मात्र दुकानातून खरेदी झाल्यानंतर 05/30 वा.च्या सुमारास दुकानातून बाहेर येवून मी माझ्याकडील मोटारसायकल 30,000 /- रुपये किंमतीची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मॉडेलची काळ्या रंगाची सिल्व्हर रंगाचा पट्टा असलेली तिचा आर.टी.ओ. पासिंग क्रमांक MH16CM4819 असा असलेली तिचा चेसीज नं. MBLHAR086J5 L08028 इंजिन नं.HA10AGJ5L23168 असा असलेली
मोटारसायकल दिसली नाही.
त्यानंतर मी माझ्या मोटारसायकलचा आजुबाजूला शोध घेतला असता ती मिळून आली नाही. यावरुन मला खात्री झाली की मी विजय कलेक्शन कापड दुकानासमोर ऊभी केलेली माझ्या भाऊ ज्ञानेश्वर याचे मालकीची मोटारसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे असे मला वाटलय त्यानंतर मी जामखेड पोलीस येथे जाऊन अज्ञात चोरट्याविरुध्द फिर्याद दाखल केली असता जामखेड पोलीसांनी सिसिटीव्ही फुटेज चेक करून दोन दिवसाच्या आत जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करून बेलवडी येथे कर्जत राशीन रोडच्या एका धाब्याच्या पाठीमागे गाडी लपून ठेवलेली होती तसेच जामखेड पोलीसांनी अरोपी कडील मुद्देमाल हस्तगत करून अरोपी प्रकाश आजिनाथ गायकवाड रा. बेनवडी ता. कर्जत वय 55 याला ताब्यात घेतले व जामखेड पोलीस स्टेशन येथे आणले.
यावेळी जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ह.प्रवीण इंगळे, जे. ए.सरोदे,आर. एन.वाघ, प्रकाश मांडगे या पथकाने ताब्यात घेतले व पुढील तपास पोलीस हवालदार प्रवीण इंगळे हे करीत आहे.