जामखेड येथे युवकावर प्राणघातक हल्ला,चार जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरात दुध घालुन घरी जात असताना आरोळे वस्ती येथील एका कीराणा दुकानासमोर आडवुन युवकावर अचानक हल्ला करत कोयत्याने सपासप वार करून गंभीर जखमी केले आहे. या प्रकरणी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी चार जणांनविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हल्ल्याचे कारण मात्र अद्याप समजु शकले नाही.
या प्रकरणी आरोपी प्रमोद प्रविण घायतडक रा. कोल्हेवस्ती, सलमान आत्तार (पुर्ण नाव माहीत नाही), रोहित शिवाजी गायकवाड व चॉंद नुर उर्फ आयन शेख तीघे रा. जामखेड आशा एकुण चार जणांनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की फीर्यादी अशोक रतन म्हस्के वय 23 वर्षे रा. कोल्हेवस्ती, जामखेड हा सोमवार दि 10 रोजी सायंकाळी जामखेड शहरात डेअरी मध्ये दुध घालुन मोटारसायकल वरुन आपल्या कोल्हे वस्ती येथे घरी चालला होता. यानंतर रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आरोळे वस्ती येथील एका कीराणा दुकाना समोर आरोपींनी फीर्यादी अशोक म्हस्के याची मोटारसायकल आडवुन गाडीची चावी काढुन घेतली.
यावेळी फीर्यादीने विचारले की मला का थांबवले आहे आसे म्हणताच आरोपी प्रमोद घायतडक त्यास म्हणाला की तु येता जाता माझ्याकडे नेहमी खुन्नस ने का बघत असतो आज तुझी मस्ती जिरवतो असे म्हणुन फीर्यादीच्या दोन्ही हातावर कोयत्याने वार केले तर आरोपी नं दोन याने हातातील चाकूने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फीर्यादीच्या कंबरेत चाकुने वार केले तर आरोपी नंबर तीन व चार यांनी त्यांच्या हातातील काठ्यांनी फीर्यादीस बेदम मारहाण केली. या हल्ल्यात फीर्यादी आशोक मस्के हा गंभीर जखमी झाला आसुन त्याच्यावर जामखेड येथील समर्थ हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी चार जणांनविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि वर्षा जाधव हे.कॉ प्रविण इंगळे, सरोदे, कोपनर, मंडगे, घोळवे
पळसे देवा यांच्या पोलीस पथकाने तात्काळ आरोपींचा शोध घेत ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि वर्षा जाधव या करत आहेत.